घरपालघरकॉलेजच्या भिंतीवर बार ,रेस्टॉरंटची जाहिरात

कॉलेजच्या भिंतीवर बार ,रेस्टॉरंटची जाहिरात

Subscribe

मोठ्या महाविद्यालय व माध्यमिक शाळा असलेल्या संकुलाच्या भिंतीवर 10 फूट बाय 30 फूट लांबीचा बार आणि रेस्टॉरंटची जाहिरात करणारा बोर्ड गेल्या अनेक दिवसापासून झळकत आहे.

वसई : शाळा व महाविद्यालय परिसरात शंभर मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थ व मद्य विक्री तर बंदी आहे. त्यावर उपाय व तरुणाईला मद्याकडे आकर्षित करण्यासाठी बार मालकांनी नवीन शक्कल शोधून काढली आहे. महापालिकेच्या आशीर्वादाने विरार पश्चिम येथील मोठ्या महाविद्यालय व माध्यमिक शाळा असलेल्या संकुलाच्या भिंतीवर 10 फूट बाय 30 फूट लांबीचा बार आणि रेस्टॉरंटची जाहिरात करणारा बोर्ड गेल्या अनेक दिवसापासून झळकत आहे.

वसईमधील दत्तानी मॉलमध्ये सुरू केलेल्या “पंखा फास्ट” या बारची जाहिरात थेट विरार पश्चिमकडील कॉलेजच्या बाहेर लावण्याचा नेमका उद्देश हा कॉलेजमधील तरुणाईला आकर्षित करण्याचा आहे हे दिसत आहे. या जाहिरातीत बारमधील इतर विशेष सुविधांची सुद्धा माहिती दिली आहे. मुळात महापालिकेने या जाहिरातीला परवानगी कशी दिली. कॉलेज प्रशासनाने यावर हरकत का नाही घेतली, असे अनेक प्रश्न यामधून निर्माण होत आहे. यावर तातडीने कारवाई करून हे जाहिरात फलक काढून टाकावेत व संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मनोज पाटील यांनी महापालिका व अर्नाळा पोलीस ठाणे यांच्याकडे केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -