घरपालघरसिडको बायपास रस्त्याचे काम सुरू

सिडको बायपास रस्त्याचे काम सुरू

Subscribe

यामुळे सतत वाहतूक कोंडीत अडकणार्‍या बोईसरच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे.

सचिन पाटील,बोईसर :  मागील अनेक वर्षांपासून रखडलेल्या बोईसर येथील सिडको बायपास रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी आमदार फाटक यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याच्या कामाचा भूमीपूजन समारंभ पार पडला. यामुळे सतत वाहतूक कोंडीत अडकणार्‍या बोईसरच्या प्रवाशांना आता दिलासा मिळणार आहे.
एमएमआरडीए अंतर्गत पालघर तालुक्यातील ३० कोटींच्या ३८ कामांना मंजुरी मिळालेली आहे. गेले वर्षभर तांत्रिक अडचणींमुळे ही कामे सुरू होण्यास उशीर झाला होता. यामध्ये बोईसरमधील ओसवाल एंपायर ते तारापूर मार्गाला जोडणार्‍या सिडको बायपास या रस्त्याचा देखील समावेश होता. एकूण ५०० मीटर लांबीच्या या रस्त्याचे २०० मीटर भागाचे सिमेंट काँक्रीटचे काम यापूर्वीच झाले आहे. मात्र ३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे काम रखडल्याने व या रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडल्याने रस्त्याची भयानक दुरवस्था झाली होती.यामुळे एमआयडीसी आणि ओसवाल एंपायरमधून तारापूर रोडला जाण्यासाठी लांबचा वळसा घालून जावे लागत असल्याने वाहनचालक आणि प्रवाशांना बस स्थानक परिसरात मोठ्या वाहतूक कोंडीत अडकून पडून त्रास सहन करावा लागत होता.पालघर तालुक्यातील एमएमआरडीए अंतर्गत मंजूर कामांमधील तांत्रिक अडचणी दूर होताच आज या कामांचा भूमीपूजन समारंभ पार पडला.
या भूमीपूजन कार्यक्रमाला बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पालघर जिल्हा संपर्कप्रमुख रविंद्र फाटक, जिल्हा प्रमुख राजेश शहा, वसंत चव्हाण, जि. प. अध्यक्ष प्रकाश निकम,जगदीश धोडी, कुंदन संखे, प्रभाकर राऊळ,संजय पाटील, माजी जि. प. अध्यक्षा वैदेही वाढाण, बांधकाम सभापती संदेश ढोणे, जि. प. सदस्या पूर्णिमा धोडी, महेंद्र भोणे, मंगेश भोईर, मुकेश पाटील, सलोनी वडे, सरपंच दिलीप धोडी, उपसरपंच निलम संखे आणि बोईसरमधील रहिवासी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -