घरपालघरपालघर जिल्ह्यात होणार विमानतळ; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे महसूल विभागाला निर्देश

पालघर जिल्ह्यात होणार विमानतळ; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंचे महसूल विभागाला निर्देश

Subscribe

पालघर जिल्ह्यात विमानतळ मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सलग एक हजार एकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महसूल विभागाला दिले आहेत.

पालघर जिल्ह्यात विमानतळ मंजूर करण्यात आले असून त्यासाठी सलग एक हजार एकर जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी महसूल विभागाला दिले आहेत. पालघर जिल्ह्यात विमानतळ उभारण्याची घोषणा आदित्य ठाकरे यांनी मुंबईत केली होती. त्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पालघरसह रत्नागिरी या दोन जिल्ह्यात विमानतळासाठी सलग एक हजार एकर जमीन शोधण्याचे निर्देश त्यांनी महसूल विभागाला दिले आहेत. पालघर हा आदिवासी बहुल जिल्हा असून या जिल्ह्यात आशिया खंडातील सर्वात मोठी बोईसर येथे औद्योगिक वसाहत आहे. त्याचबरोबर माहिम, पालघर, शिरगाव, अल्याळी, टेंभोडे, धनसार, वेवूर, घोलवीरी, वसई, वाडा, तलासरी आदी ठिकाणी औद्योगिक वसाहती आहेत.

जिल्ह्याला ११२ किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा असून दुसऱ्या बाजूला सह्याद्री पर्वताच्या रांगा आहेत. जिल्ह्यात नायगाव, वसई, नालासोपारा, विरार, वैतरणा, सफाळे, केळवा रोड, पालघर, बोईसर, वाणगाव, घोलवड, बोर्डी ही रेल्वे स्थानके आहेत. पश्चिम रेल्वेच्या प्रवाशी, मालवाहू ट्रेन याभागातून धावत आहेत. याचा लाभ पर्यटन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात होत आहे. मुंबई, धुळे, जळगाव, नंदुरबार, नवी मुंबई, नाशिक यासह गुजरात राज्यातील वापी, बलसाड, सूरत तसेच केंद्र शासित प्रदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने यापरिसरात येत असतात.

- Advertisement -

जिल्ह्यातील औद्योगिक आणि पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टीने विमानतळ उभारण्याची घोषणा केली होती. त्यासाठी पर्यटन सचिव, महसूल आयुक्त, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, जिल्हाधिकारी यांची संयुक्त बैठक त्यांनी बोलावली होती. या बैठकीत त्यांनी सलग एक हजार एकर जागा शोधण्याचे निर्देश दिले. जिल्ह्यातील कार्यालये, न्यायालय, रुग्णालय उभारण्यासाठी दुग्धविकास विभागाच्या साडेतीन हजार एकर पैकी ४४० हेक्टर जमीन सिडकोला वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे सलग एक हजार एकर जमिनीचा सलग पट्टा उपलब्ध होणे कठीण झाले आहे.

हेही वाचा –

Anganewadi jatra 2022: आंगणेवाडी यात्रेनिमित्त मध्य रेल्वेवर १० विशेष गाड्या, पाहा संपूर्ण

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -