घरपालघरडहाणूमधील आयआरबी विरोधातील आंदोलन स्थगित

डहाणूमधील आयआरबी विरोधातील आंदोलन स्थगित

Subscribe

आयआरबी रुग्णवाहिका व मोटारसायकल यांच्या अपघातप्रकरणी आयआरबीच्या रुग्णवाहिकेच्या धडकेत अपघातात मृत पावलेल्या व अपघातात जखमी झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन पुकारले होते.

आयआरबी रुग्णवाहिका व मोटारसायकल यांच्या अपघातप्रकरणी आयआरबीच्या रुग्णवाहिकेच्या धडकेत अपघातात मृत पावलेल्या व अपघातात जखमी झालेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भाजप व काही स्थानिक सामाजिक संस्था यांनी संयुक्तपणे २७ फेब्रुवारी रोजी आंदोलन पुकारले होते. परंतु, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेत कासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत शिंदे यांच्या माध्यस्तीने आंदोलकांच्या प्रश्नांवर आयारबीच्या लक्ष केंद्रित करण्यासाठी आंदोलनापूर्वी आंदोलक व आयआरबी अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आयआरबीचे अधिकारी उपस्थित असून त्यांनी आंदोलकांना मार्चच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा एक बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात जर आंदोलकांचा प्रश्न मार्गी लागला नाही तर, आंदोलकांकडून पुन्हा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजप व सामाजिक संस्थांनी दिला आहे.

आयआरबीच्या रुग्णवाहिकेने ९ फेब्रुवारी रोजी एक मोटारसायकलला धडक देत जखमींना घटनास्थळीच सोडून तेथून पळ काढला होता. अपघातात मोटारसायकल चालक तुकाराम शेलार यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांची पत्नी तनुजा शेलार व नात गौरी शेलार हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. याविषयी शेलार कुटुंबियांनी कासा पोलीस ठाण्यात रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर रुग्णवाहिका चालक यांना कासा पोलिसांनी अटक करून कोर्टात हजर केले होते. तेथे रुग्णवाहिका चालकाला जमीन मंजूर करण्यात आला आहे. मोटारसायकल चालकाच्या पत्नी व नात या दोघांवर उपचार सुरू असून अपघाताला जबाबदार असलेल्या आयआरबी कंपनीकडून पीडित कुटुंबियांना मदत मिळावी, अशी अपेक्षा पीडित कुटुंबीयांनी व्यक्त केली असून लवकरच यावर निर्णय घेण्यात येणार असल्याचे दिसत आहे.

- Advertisement -

चिमुकली गौरी शेलार हिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर मोठ्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गौरीच्या मेंदूला मार लागला असून एक पाय फॅक्चर व अर्ध्या शरिराला अपंगत्व आल्याची माहिती कुटुंबियांकडून मिळाली आहे. तसेच तनुजा शेलार यांना देखील गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावरही उपचार सुरू आहेत. आयआरबीच्या रुग्णवाहिका चालकाच्या हलगर्जीपणा मुले एक कुटुंबच उद्ध्वस्त केल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

हेही वाचा –

युद्धाचे ढग! रशियन सैन्य युक्रेनमध्ये घुसले; आता अमेरिका, पाश्चात्य देशांची भूमिका काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -