Saturday, June 3, 2023
27 C
Mumbai
घर पालघर २०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी

२०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी

Subscribe

वस्तीगृहासाठी आवश्यक इमारत बांधकाम व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आरोग्य उपसंचालक आणि अतिरिक्त संचालक यांना आमदार भुसारा यांनी केली आहे.

ज्ञानेश्वर पालवे, मोखाडा :  जव्हार कुटीर रुग्णालय हे १०० खाटांचे होते.हे रुग्णालय २०० खाटांचे व्हावे अशी मागणी याआधीही बर्‍याचदा झाली. त्यास मंजुरीही मिळाली. मात्र प्रत्यक्षात इमारत भौतिक सुविधा यासाठी जागा नसल्यामुळे प्रत्यक्षात ते कार्यान्वित झाले नाही.यानंतर आमदार सुनिल भुसारा यांनी आमदार होताच जव्हार येथे २०० खाटांच्या रुग्णालयासाठी पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आले असून लवकरच त्यासंदर्भातील कार्यवाही शासनपातळीवर सुरू आहे. मात्र आता २०० खाटांच्या रुग्णालयाला सलग्न नर्सिंग प्रशिक्षण केंद्रालाही मान्यता मिळाल्याने यासाठीही कॉलेज आणि वस्तीगृहासाठी आवश्यक इमारत बांधकाम व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी आरोग्य उपसंचालक आणि अतिरिक्त संचालक यांना आमदार भुसारा यांनी केली आहे.

कुटीर रुग्णालय हे १०० खाटांचे होते. त्याचे रूपांतर २०० खाटांच्या रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.जव्हार ,मोखाडा,विक्रमगड वाडा या तालुक्यातील आदिवासी गोरगरीब रुग्ण आरोग्य सुविधांकरीता पूर्णपणे याच रुग्णालयावर अवलंबून आहेत.केंद्र शासनाच्या मार्गदर्शिकेनुसार २०० खाटांच्या रुग्णालयाला सलग्न नर्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरु करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.पालघर सारख्या दुर्गम भागात सध्यस्थितीत एकही शासकीय नर्सिंग प्रशिक्षण केंद्र नाही. यामुळे आता या सरकारने तात्काळ २०० खाटांच्या रुग्णालयाच्या इमारतीचा मुद्दा कार्यान्वित करून या मतदारसंघातील सर्वसामान्य गोर गरीब जनतेला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध कराव्यात तसेच या भागातील तरुण मुल मुलीना नर्सिंग कोर्ससाठी पहिल्यादाच शासकीय प्रशिक्षण केंद्राची तात्काळ निर्मिती करावी अशी अपेक्षा भुसारा यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -