घरपालघरबोईसरमध्ये लवकरच नगरपालिका होणार

बोईसरमध्ये लवकरच नगरपालिका होणार

Subscribe

यावेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

वसईः बोईसर ग्रामपंचायतीचे रुपांतर नगरपालिकेमध्ये करण्यासंबंधी राज्य सरकार लवकरच सकारात्मक निर्णय घेणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलेल्या शिष्टमंडळाला दिली. तारापूर इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चरस्र असोसिएशन (टीमा) सदस्यांनी आमदार राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री शिंदे यांनी बोईसर नगरपालिका लवकरच अस्तित्वात येईल, अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार श्रीनिवास वनगा, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील उपस्थित होते.

उद्योग वाढले तर रोजगार वाढून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील. उद्योगांच्या समस्या लवकरच दूर करून राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करू. उद्योग वाढीसाठी जागा, तसेच नवीन उद्योगासाठी जमीन आणि शासनाच्या विविध परवानग्या या लवकरात उपलब्ध होण्यासाठी सकारात्मक निर्णय घेऊ. उद्योग वाढीसाठी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना सुचना दिलेल्या आहेत, अशी माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.तसेच सर्व संबंधित अधिकार्‍यांसमवेत तातडीने बैठक घेऊन उद्योगांचे सर्व प्रश्न युध्दपातळीवर सोडवण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांना निर्देश यावेळी दिले. उद्योगांमधून लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतो. हे उद्योग वाढावेत यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल. उद्योजकांना कोणत्याही प्रकारचा त्रास, कोणत्याही प्रकारची अडचण जिल्ह्यामध्ये होऊ नये, अशा सुचनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी गोविंद बोडक व पोलीस अधिक्षक बाळासाहेब पाटील यांना दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -