Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर ठाणे उपरी वीजवाहिनीचे काम एमएमआरडीएकडून प्रलंबित

उपरी वीजवाहिनीचे काम एमएमआरडीएकडून प्रलंबित

Subscribe

महावितरणकडून सातत्याने पाठपुरावा, धक्का लागून कंटेनर चालकाचा मृत्यू

अंबरनाथ एमआयडीसीतील कोणार्क बिझनेस पार्कसमोर शुक्रवारी (२६ मे) सकाळी एक कंटेनर उपरी वीजवाहिनीच्या संपर्कात येऊन चालकाचा मृत्यू झाला आहे. कल्याण ते बदलापूर रस्त्याचे काम एमएमआरडीएनकडून सुरू असून रस्त्याची ऊंची वाढल्याने उपरी वीजवाहिन्या व रस्त्यामधील अंतर कमी झाले आहे. उच्चदाब वीजवाहिन्यांची ऊंची वाढवण्याच्या कामबाबत महावितरणने सर्व सोपस्कार पूर्ण करून सातत्याने एमएमआरडीएकडे पाठपुरावा केला आहे. फेब्रुवारी २०२० पासून हे काम एमएमआरडीएकडून प्रलंबित आहे.
कल्याण ते बदलापूर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अंबरनाथ पश्चिमेत सुरू आहे. सिमेंट रस्ता आणि रुंदीकरणामुळे बहुतेक ठिकाणी रस्त्याची ऊंची वाढली असून उपरी वीजवाहिनी व रस्त्यामधील अंतर कमी झाले आहे. सदर कामामध्ये महावितरणची उपरी वीजवाहिनी स्थलांतरीत करून देण्याचे एमएमआरडीएने मान्य केले होते. त्यानुसार एमएमआरडीएने जानेवारी २०२० मध्ये स्व:ताची एजन्सीही नियुक्त केली. एमएआरडीएच्या अर्जावर कार्यवाहीचे सोपस्कार पूर्ण करून कामाच्या अंदाजपत्रकाला मान्यता देऊन महावितरणने फेब्रवारी २०२० मध्ये एमएमआरडीएला डिमांड नोटही पाठवली. वीजवाहिन्या स्थलांतरीत करण्याचे प्रलंबित काम पूर्ण करण्याबाबत जुलै २०२० मध्ये महावितरणने पुन्हा एमएमआरडीएला पत्र पाठवले. याच महिन्यात ठाणे जिल्ह्याच्या विद्युत निरिक्षक यांना पत्र पाठवून महावितरणने संभाव्य धोक्याची कल्पना देऊन सदर काम तातडीने पूर्ण होण्याची आवश्यकता व्यक्त केली. मार्च २०२१ मध्ये पुन्हा पत्र पाठवून महावितरणने एमएमआरडीएला सदर काम तातडीने पूर्ण करण्याची विनंती केली. परंतू एमएमआरडीएने अजूनही हे काम हाती घेतलेले नाही.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -