घरपालघरघरफोडी, चोरी करणार्‍या आरोपींना अटक

घरफोडी, चोरी करणार्‍या आरोपींना अटक

Subscribe

ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची केलेल्या या कामगिरीमुळे चोरटे गजाआड झाले आहेत. अथक प्रयत्नांनंतर संबंधित आरोपींना शोधून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

वसई : घरफोडी, चोरी करणार्‍या आरोपींना अटक करुन गुन्हयातील ४, ६३,१००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात वालीव पोलिसांना यश आले आहे. ठाणे, गुन्हे प्रकटीकरण पथकाची केलेल्या या कामगिरीमुळे चोरटे गजाआड झाले आहेत. अथक प्रयत्नांनंतर संबंधित आरोपींना शोधून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
वालीव पोलीस ठाणे हद्दीतील घरफोडी व चोरी करणारे आरोपी यांच्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या व तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करुन गुन्हे अभिलेखावरील आरोपी व इतर आरोपी नावे १) शमीम ऊर्फ राजा रमजान अन्सारी, २) बालकराम ऊर्फ मुन्ना रामकिशन विश्वकर्मा, ३) वलीऊल्ला शफीऊल्ला चौधरी, ४) चाँद ऊर्फ हामीद शफीक अहमद रईन,यांना गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी वालीव पोलीस ठाण्याचे हददीत व निर्मळनगर पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे.
त्यांच्याकडून खालील नमूद गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटार सायकल, रोख रक्कम, कंपनीतील लोंखडी व स्टील पार्ट, सोन्याचे व चांदीचे दागिने, वाहनाच्या बॅट-या व चाके, मोबाईल असा एकूण ४, ६३,१०० /- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -