घरपालघरजव्हारमध्ये स्ट्रॉबेरीनंतर सामुहिक शेती

जव्हारमध्ये स्ट्रॉबेरीनंतर सामुहिक शेती

Subscribe

केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी शेती आणि त्यावर चालणारी शेतकर्‍यांची गुजराण यामध्ये काहीतरी बदल करावा, यासाठी नेहमी धडपड असणारे जव्हारचे तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी काही महिन्यांपूर्वीच जव्हारसारख्या ठिकाणी महाबळेश्वर येथील प्रमुख स्ट्रॉबेरीचे पीक काढून आधुनिक शेतीचा पाया रोवला आहे.

स्ट्रॉबेरीनंतर आता सामुहिक शेतीचा प्रयोग यशस्वी करून जव्हारच्या कृषी अधिकार्‍यांनी आदिवासी समाजासाठी रोजगाराची नवी दालने उघडली आहेत. जव्हार तालुका आदिवासी ग्रामीण तालुका. केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी शेती आणि त्यावर चालणारी शेतकर्‍यांची गुजराण यामध्ये काहीतरी बदल करावा, यासाठी नेहमी धडपड असणारे जव्हारचे तालुका कृषी अधिकारी अनिल गावित यांनी काही महिन्यांपूर्वीच जव्हारसारख्या ठिकाणी महाबळेश्वर येथील प्रमुख स्ट्रॉबेरीचे पीक काढून आधुनिक शेतीचा पाया रोवला आहे. वैयक्तिक स्वरूपात शेती केल्यानंतर सामूहिकरीत्या शेती केल्यास कशी फायद्याची ठरते यासाठी प्रायोगिक तत्त्वावर खरवंद या गावामध्ये ६ शेतकर्‍यांना एकत्र आणून हरभरा लागवड करून त्यातून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करून भरघोस पीक काढले. त्यातून शेतकर्‍यांना चांगले उत्पन्न मिळाल्याने सामुहिक शेतीचे नवे समीकरण पुढे आले आहे.

जव्हार तालुका कृषी विभागाच्या मार्गदर्शनात खरवंदयेथे लगतची शेत जमीन असलेल्या६शेतकर्‍यांना एकत्र करून हरभरा लागवड कशी फायदेशीर आहे. त्यातून मिळणारे उत्पन्न शिवाय त्यासाठी करावी लागणारी मशागत या संपूर्ण बाबीचे कौशल्य प्रात्यक्षिकरित्या समजवण्यात आले होते. सदाशिव राऊत,विष्णू चौधरी,गोविंद गावित,बाळकृष्ण चौधरी,देवराम चौधरी,प्रितेश चौधरी या ६ शेताकर्‍यांनी सामुदायिक हरभरा पेरणी केली होती. हरभरा काढल्यानंतर आनेवारी काढली असता प्रति गुंठा१२किलो१००ग्राम उत्पन्न आले असून एकूण उत्पन्न६००किलोग्राम आले.

- Advertisement -

जव्हार तालुक्यामध्ये पडणारा प्रचंड पाऊस पाणी अडवण्यासाठी प्रशासनाच्या दृष्टीने करण्यात आलेले सर्व प्रयत्न निष्फळ ठरत आहे. अशावेळी काही सामाजिक संस्थांनी तालुक्यामध्ये केलेल्या विकासाची कामे खुपचउल्लेखनीय आहेत. जव्हारसारख्या ठिकाणी कधीही न होऊ शकलेली किंवा कधीही न होणारी स्ट्रॉबेरी आता जव्हारचा एक वेगळाच ठसा उमटवत आहे. कोणतीही गोष्ट करण्यासाठी एक मानसिकता असावी लागते. जमिनीत पेरलें तिथे उगवणार आहे.या गोष्टीचा विचार करून आधुनिक शेती येथील मजुरांचे स्थलांतर, कुपोषण, साक्षरता,स्वयंरोजगार यासर्व गोष्टी मजबूत करून तालुक्यात एक वेगळा शेतीबाबत पायंडा पडणार आहे.

हेही वाचा –

‘जनाची नाही, किमान मनाची बाळगा’; नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -