Wednesday, May 12, 2021
27 C
Mumbai
घर पालघर सायकल ट्रॅकच्या कामाची चौकशी

सायकल ट्रॅकच्या कामाची चौकशी

वसई विरार महापालिका हद्दीतील नवघर-माणिकपूर शहराच्या हद्दीत सुरुअसलेल्या सायकल ट्रॅकचे काम सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे केले जात असल्याची तक्रार काँग्रेसने केल्यानंतर राज्य सरकारने याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत.

Related Story

- Advertisement -

वसई विरार महापालिका हद्दीतील नवघर-माणिकपूर शहराच्या हद्दीत सुरुअसलेल्या सायकल ट्रॅकचे काम सरकारी जागेवर बेकायदेशीरपणे केले जात असल्याची तक्रार काँग्रेसने केल्यानंतर राज्य सरकारने याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. वसई पश्चिमेच्या परिसरात सनसिटी येथील चुळणा गास रस्त्यावर महापालिकेतर्फे नागरिकांना विनाअडथळा सायकल चालवता यावी, यासाठी सायकल ट्रॅक तयार करण्याचे काम सुरू केले आहे. वसई विरार शहरातील हा पहिला सायकल ट्रॅक आहे. त्याला काँग्रेसचे जिमी घोन्सालविस यांनी हरकत घेतली आहे. गास चुळणा या अनधिकृत रस्त्यावर सुरु असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाला स्थगिती देऊन महापालिकेचे संबंधित अधिकारी, अभियंता, नगरसेवकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी घोन्सालवीस यांनी नगरविकास विभागाकडे केली आहे.

गास-चुळणे रस्ता खाजण व खासगी शेतकर्‍यांच्या जमिनीमध्ये माती, दगडाचा बेकायदा भराव करून करण्यात आलेला आहे. महापालिकेच्या विकास नियंत्रण नियमावलीच्या मंजूर आराखड्यामध्ये हा रस्ता मंजूर करण्यात आलेला नाही. महापालिका प्रशासनाला कोणताही अधिकार नसताना हा अनधिकृत रस्ता बनवून कररुपी पैशांचा चुराडा केल्याची तक्रार घोन्सालवीस यांनी यापूर्वी केली होती. राष्ट्रीय हरित लवादाने या तक्रारीची गंभीर दखल घेऊन सदरचा रस्ता तोडण्याचे आदेश दिले होते.

- Advertisement -

दिवाणमान गावामध्ये विविध प्रयोजनार्थ आरक्षित असलेल्या सरकारी जमिनी उच्च न्यायालयाने अतिक्रमणापासून वाचवण्यासाठी महसूल खात्याकडून महापालिकेकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा विकास व मालकी हक्क महापालिकेला देण्यात आलेला नाही. आरक्षित जमिनीवर विकास करावयाचा असल्यास महापालिकेला राज्य सरकारकडून मालकी हक्क घेणे बंधनकारक आहे. त्याचबरोबर आरक्षित जमिनीवर विकास करताना केंद्र व राज्य सरकारच्या विविध खात्यांच्या परवानग्या घेणेही बंधनकारक आहे, असे असताना महापालिकेने सर्व नियम धाब्यावर बसवून गास-चुळणे रस्ता बनवला आहे. आता बेकायदेशीर सायकल ट्रॅक बनवण्याचे काम सुरु केले आहे. या कामासाठी महापालिकेकडून मोठ्या प्रमाणात माती भराव टाकण्याचे काम सुरू आहे.पावसाचे पाणी जमा होते अशा भागातच हा माती भराव केला जात असल्याने वसईतील आजूबाजूची गावे ही पाण्याखाली जाऊन पूरस्थिती निर्माण होण्याची भीती घोन्सालवीस यांनी व्यक्त केली आहे. ही जागा शासनाची असतानाही या जागेत माती भराव सुरू केला आहे. महापालिकेने सुरू केलेले काम हे बेकायदेशीर स्वरूपाचे असल्याने यावर कारवाई करण्याची मागणी घोन्सालविस यांनी राज्य शासनाकडे केली होती.

या तक्रारीची दखल घेत राज्य शासनाच्या नगरविकास विभागाच्या अप्पर सचिव निकिता पांडे यांनी महापालिकेचे आयुक्त यांना आदेश काढून चुळणा गास येथील अनधिकृत रस्त्यावर सुरू असलेल्या सायकल ट्रॅकच्या कामाला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच तक्रारीत उपस्थित केलेल्या मुद्दयांच्या अनुषंगाने वसई-विरार महापालिकेचा स्वयंस्पष्ट अहवाल ही शासनाला तात्काळ सादर करावा, असाही आदेश दिला आहे.

- Advertisement -