घरपालघरमहापालिकेतील आर्थिक अपहाराची एसीबीकडे तक्रार

महापालिकेतील आर्थिक अपहाराची एसीबीकडे तक्रार

Subscribe

सदर प्रश्नी पहिल्यांदा आवाज उठवणारे भट यांचे जाबजबाब एसीबीने नोंदवले असून सदर प्रकरण एसीबीने राज्याच्या गृहखात्याकडे वर्ग केले आहे.

वसईः वसई -विरार महापालिकेचे अधिकारी कर वसुलीच्या रकमेचा अपहार करत असल्याचे उजेडात आल्यानंतर पर्यावरण अभ्यासक चरण भट यांनी अँटीकरप्शनकडे तक्रार केली आहे. अँटीकरप्शनने त्यांचा सोमवारी जबाब नोंदवून घेतला. वसई-विरार शहर महापालिकेतील कर अधिक्षकाने मालमत्ता व पाणीपट्टीची कर आकारणीत गोळा झालेल्या रकमेचा अपहार करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येताच सदर प्रकरणी चौकशी करून कर अधिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. मात्र हे प्रकरण वाटते तितके सोपे नसून महापालिकेतील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्यासाठी आता थेट लाचलुचपत विभागच मैदानात उतरला आहे. सदर प्रश्नी पहिल्यांदा आवाज उठवणारे भट यांचे जाबजबाब एसीबीने नोंदवले असून सदर प्रकरण एसीबीने राज्याच्या गृहखात्याकडे वर्ग केले आहे.

एसीबीकडून याप्रकरणी गंभीर दखल घेतली गेल्याने महापालिकेतील बडे मासे आता एसीबीच्या रडारवर असल्याचे बोलले जात आहे. याप्रकरणात भट यांचे जबाब एसीबीकडून नोंदवण्यात आले आहेत. महापालिकेकडूनही याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्या नऊही प्रभागातील कर वसुलीची चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अहवालानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -