घरपालघररानगावातील तिवरतोड प्रकरणी हरित लवादाकडे तक्रार

रानगावातील तिवरतोड प्रकरणी हरित लवादाकडे तक्रार

Subscribe

रानगाव येथील समुद्रकिनार्‍यालगत सर्वे क्रमांक ३६ मधे कांदळवन आहे.

वसई : वसई पश्चिमेच्या रानगाव येथील तिवरांच्या झाडाची कत्तल करून त्या जागेवर १७ लाखांचे पतन विभागाचे बेकायदा बांधकाम केल्याप्रकरणी राष्ट्रीय हरित अधिकरण (हरित लवादा) यांच्याकडे दाद मागण्यात आलेली आहे. पतन विभागाने मंजूर केलेले विकासकाम हे रानगाव राम आळी असताना येथून दोन अडीच किलोमीटर अंतरावर तिवरांच्या झाडांची कत्तल करून बेकायदा विकास काम केल्याची तक्रार करण्यात आली आहे. रानगाव येथील समुद्रकिनार्‍यालगत सर्वे क्रमांक ३६ मधे कांदळवन आहे. सदर वने नष्ट करण्याचा प्रयत्न केल्यास कायदेशीर तरतूदीनुसार पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ नुसार गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाते. तशा स्वरूपाचा फलक महसूल विभागाने लावला होता. सदर फलक गायब करून पत्तन अभियंता यांचा फलक लावून बांधकाम सुरु करण्यात आले. बांधकाम करताना तिवरांची झाडे नष्ट करण्यात आली आहेत. तसेच बेकायदा माती भराव करून बांधकाम करण्यात आल्याची तक्रार हरित लवादाकडे करण्यात आली आहे. नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांना विचारणा केली असता तलाठी सजा कौलार यांनी या जागेचा स्थळ पंचनामा दाखल केला असून या प्रकरणी दोषीवर फौजदारी कारवाई होणार असल्याची माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -