घरपालघरमहावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

महावितरणच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

Subscribe

या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता जीवदानी रोडवरील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मुकुंद देशमुख यांनाही फोन केला असता तेही फोन उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत.

वसई : बुधवारी सकाळी आठच्या सुमारास गेलेली वीज संध्याकाळपर्यंत आलेली नसल्याने या परिसरातील रहिवाशांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला. रहिवाशी उकाड्याने हैराण झाले असताना महावितरणचे अधिकारी मात्र नॉट रिचेबल झाले होते. त्यामुळे संतप्त विरारकरांनी महावितरणाच्या विरारमधील अधिकार्‍यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.
वीज का गेली. कोणत्या विभागात कसले काम सुरू होते?. वीज कधी येणार?. याबाबत विचारणा करण्यासाठी विरार पूर्व नाना-नानी पार्क विभागातील महावितरणचे अभियंता साखरे यांना फोन केला असता त्यांनी बिलकूल प्रतिसाद दिलेला नसल्याच्या रहिवाशांच्या तक्रारी आहेत. या संदर्भात अधिक माहिती घेण्याकरता जीवदानी रोडवरील कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी मुकुंद देशमुख यांनाही फोन केला असता तेही फोन उचलत नसल्याच्या तक्रारी आहेत.

संध्याकाळी ७ च्या सुमारास वीज परतली असली तरी बहुतांश विभागात सुरळीत वीज पुरवठा नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे नाना-नानी पार्क येथील कार्यालयात साखरे यांना भेटण्यास गेलेल्या रहिवाशांना ते जागेवर नसल्याचे निदर्शनास आलेले आहे. कार्यालयातूनही योग्य ती माहिती मिळत नसल्याने विचारणा करावी तरी कुणाला? असा प्रश्न या परिसरातील रहिवाशांपुढे आहे. दरम्यान, बुधवारी एका कामादरम्यान ’कामगार सुरक्षा कायद्या’चे उल्लंघनही या दोघा अधिकार्‍यांकडून झालेले आहे. विरार-कारगिल नगर येथील दुर्घटनेनंतरही येथील स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे या सगळ्याला कारणीभूत ठरवत या दोघांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे, अशी मागणी या परिसरातील नागरिक आणि राजकीय पक्षांनी केलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -