घरपालघरउमेळावासियांचा महापालिकेकडून अपेक्षाभंग

उमेळावासियांचा महापालिकेकडून अपेक्षाभंग

Subscribe

पण, ती मागणी मान्य न झाल्याने उमेळावासियांची निराशा झाल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे.

वसईः महापालिकेने नायगाव स्टेशन ते वसई तहसिल कचेरी बससेवा उमेळापर्यंत विस्तारीत केली असली तरी तिचा मार्ग सोयीचा नसल्याने उमेळावासियांच्या पदरी निराशा आली आहे. वसई- विरार महापालिकेची वसई तहसील कचेरी ते उमेळा गाव – नायगाव स्टेशन ( प) मार्गे व परत अशी विस्तारित बस सेवा सुरू झाली आहे. उमेळा गावापर्यंत येणारी ही बस परत उमेळहून नायगाव स्टेशन (प) मार्गे तहसील कचेरीपर्यंत जाईल. उमेळामार्गे महापालिकेची बससेवा असावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप राऊत यांनी केली होती. पण, ती मागणी मान्य न झाल्याने उमेळावासियांची निराशा झाल्याची खंत राऊत यांनी व्यक्त केली आहे.

उमेळा येथून शासनाची एसटी बंद झाल्यापासून वसई गाव परिसरात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. वसई येथे बाजारहाट, डॉक्टर, सरकारी दवाखाना, खाजगी रुग्णालये, बँक , खाजगी क्लासेस व इतर संस्था येथे ये-जा करणे कष्टप्रद होते. ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शन वसई येथील बँकांमध्ये आहेत. रिक्षांचे भाडे रु. १००/- ते १२०/- असायचे. म्हणून उमेळा गाव ते वसई बस सेवेची मागणी राऊत यांनी केली होती. त्यावर नायगाव ते वसई गाव उमेळामार्गे या मार्गावर लवकरात लवकर परिवहन समितीच्या सभेत झालेल्या निर्णयानुसार बससेवा चालू करण्यात येईल असे सांगण्यात आले होते. शेवटी बससेवा सुरू झाली. पण ती अगोदर चालू असलेली तहसील ते नायगाव स्टेशन (प) अशा मार्गाची सेवा पुढे फक्त उमेळा गावापर्यंत नेण्यात आली आहे व परतीचा मार्ग उमेळा गाव – नायगाव स्टेशन – नायगाव – किरावली – पापडी चर्च – वसई डेपो मार्गे वसई तहसील असा असणार आहे. उमेळा गावातून नायगाव स्टेशन ( प) साठी सकाळी ५ वाजल्यापासून ते मध्यरात्री पर्यंत रिक्षा सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे महापालिकेच्या बस सेवेचा हा मार्ग उमेळावासीयांसाठी सोयीचा नाही आहे. मूळ मागणी व चर्चेनुसार हा मार्ग नायगाव स्टेशन ( पश्चिम) ,साकाई नगर, सॉल्ट कॉलनी, उमेळा गाव, उमेळमान फाटा, पापडी इंडस्ट्रियल इस्टेट, उमेळा फाटक, पापडी, तामतलाव, सागरशेत, वसई डेपो, तहसील कचेरी व परत असा हवा आहे. आताच्या मार्गाने उमेळावासीयांना उमेळा फाटक व पापडी बाजार येथे जाता येणार नाही. उमेळा फाटकात उतरून पुढे बंगली हॉस्पिटल व नवघर बाजूस इतर ठिकाणी जाणे शक्य होणार नाही. या मार्गाने बस सेवा ही उमेळमान, पापडी इंडस्ट्रियल इस्टेट व वसईवासीयांनाही सोयीची पडेल. म्हणून अपेक्षित मार्गावर बससेवा सुरू करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -