घरमहाराष्ट्रBJP : पंतप्रधानांची औरंगजेबासोबत तुलना, भाजपाची संजय राऊतांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

BJP : पंतप्रधानांची औरंगजेबासोबत तुलना, भाजपाची संजय राऊतांविरुद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केल्याने भाजपामधील नेते आक्रमक झाले आहेत. त्यामुळे भाजपाने राऊतांची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.

नवी दिल्ली : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढणार आहेत. कारण संजय राऊत यांना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात केलेले वक्तव्य आता चांगलेच भोवणार आहे. राऊतांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे देखील तिथेच उपस्थित होते. ज्यामुळे आता भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी राऊतांविरोधात आणि ठाकरेंविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून, त्यांनी याबाबतची तक्रार केंद्रीय निवडणूक आयोगात केली आहे. (BJP has complained Sanjay Raut to Election Commission for comparing PM Narendra Modi with Auranzeb)

हेही वाचा… Vijay Shivtare : अजित पवारांच्या विरोधात जाणे पडणार भारी, शिवसेना शिवतारेंना धाडणार शिस्तभंगाची नोटीस

- Advertisement -

“नरेंद्र मोदी का जहाँ जन्म हुआ है, उसी के पास औरंगजेब पैदा हुआ था, इसिलिए औरंगजेब की मानसिकता के साथ हमारे उपर हमला होता है,” असे वादग्रस्त वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. बुलढाणा जिल्ह्यातील एका सभेत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संजय राऊत यांनी हे वक्तव्य केले होते. त्यामुळे आता या भाषणाची सीडी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींकडून निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. भाजपाचे नेते अश्विनी वैष्णव, ओम पाठक, विनोद तावडे आणि संजय मयुख यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवत त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.

तसेच, संजय राऊत यांनी जनप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 123 (4) चे आणि आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले असून कलम 125 नुसार दोन समुदायात द्वेषाची भावना निर्माण करणे आणि भादंविच्या 153 अ, 153 ब, 499 कलमानुसार तक्रार करण्यात आली आहे. त्याशिवाय या पत्राच्या माध्यमातून सुब्रमण्यम स्वामी विरुद्ध केंद्र सरकार, दिनकरन विरुद्ध सीटी पब्लिक, अभिरामसिंग विरुद्ध सीडी कोम्माचेन इत्यादी सुप्रीम कोर्टाच्या खटल्यांतील निकालांचा दाखला देण्यात आला आहे. तर, उद्धवन ठाकरे यांच्या उपस्थितीत राऊतांनी हे वादग्रस्त वक्तव्य केल्याने तेही या गुन्ह्यातील भागीदार आहेत, असे भाजपाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाला सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

ज्यामुळे आता खासदार संजय राऊत आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना तत्काळ पंतप्रधानांची माफी मागण्याचे निर्देश द्यावेत, तसेच संजय राऊत यांच्यावर तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, असी मागणी भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी निवडणूक आयोगाला पत्राच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोगाकडून या प्रकरणी नेमका काय निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर भाजपाने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या या पत्रामुळे संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -