घरपालघरभात बियाणे वाटपात कृषी अधिकार्‍याचा भेदभाव

भात बियाणे वाटपात कृषी अधिकार्‍याचा भेदभाव

Subscribe

मागील वर्षी तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकर्‍यांना दिलेले नागलीचे बियाणे हे हळव्या जातीचे असल्याने बर्‍याचशा शेतकर्‍यांच्या हाती मात्र निराशा आलेली होती.

मोखाडा : यंदा मोखाडा तालुका कृषी कार्यालयात आलेले रत्नागिरी ७ हे भात बियाणे प्रायोगिक तत्त्वावर ठराविक शेतकर्‍यांनाच दिल्याने इतर शेतकर्‍यांकडून तालुका कृषी अधिकार्‍यांच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.अवघ्या काही दिवसांवर आलेल्या पावसाळ्यात भात पिकाच्या पेरणीसाठी शासनाकडून कर्जत, रत्नागिरी यांसारख्या हळवा किंवा गरवा भाताची बियाणे प्रायोगिक तत्त्वावर दिली जातात. परंतु ही भाताची बियाणे आल्यानंतर मात्र कृषी अधिकारी आपल्या मर्जीतील शेतकर्‍यांनाच वेगवेगळ्या वाणांची बियाणे लागवडीसाठी देत असल्याने इतर शेतकरी मात्र बियाणेच्या लाभापासून वंचित राहत आहेत.मागील वर्षी तालुका कृषी कार्यालयाकडून शेतकर्‍यांना दिलेले नागलीचे बियाणे हे हळव्या जातीचे असल्याने बर्‍याचशा शेतकर्‍यांच्या हाती मात्र निराशा आलेली होती.

पावसाची अनियमितता तसेच शेतकर्‍यांना मिळालेली नागलीची बियाणी जास्त हळवी निघाल्याने व कृषी अधिकार्‍यांनी वेळेवर मार्गदर्शन न केल्याने नागलीच्या रोपाची लागवड करण्या अगोदरच पेरणी केलेल्या जागेतच नागलीच्या रोपाला कणीस तयार झाले होते. त्यामुळे शेतकर्‍यांची मागील वर्षी नागली बियाणामुळे हातचा घास वाया गेल्याने पदरी निराशा आली होती.

- Advertisement -

भाताचे बियाणे कमी असल्याने मोजक्याच शेतकर्‍यांना रत्नागिरी ७ या वाणाचे भाताचे बियाणे प्रायोगिक तत्त्वावर दिले आहे..”
– प्रेमदास राठोड, प्रभारी तालुका कृषी अधिकारी, मोखाडा

आम्हाला माहीत पण नाही भाताचे बियाणे कधी आले आणि कधी वाटले. बियाणे मिळाले असते तर आम्ही पण रत्नागिरी ७ या वाणांची लागवड केली असती. बाजारात बियाणे घ्यायला गेलो की किंमती जास्त असते. मी यापूर्वी सुध्दा योजनेच्या लाभासाठी अर्ज दिलेले आहेत. परंतु आजपर्यंत मला योजनेचा लाभ मिळालेला नाही.”
– जग्गन जाधव.वंचित शेतकरी, गभालपाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -