घरपालघरलसीकरणावर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम

लसीकरणावर आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभाराचा परिणाम

Subscribe

मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने आदिवासी नागरीक लसीकरणावर गर्दी करू लागले आहेत. पण, आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लसीपासून हजारो नागरीक वंचित राहिले आहेत.

मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने आदिवासी नागरीक लसीकरणावर गर्दी करू लागले आहेत. पण, आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे लसीपासून हजारो नागरीक वंचित राहिले आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी विक्रमगड तालुक्यात आरोग्य विभागाने व्यापक लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. असे असले तरी विक्रमगड हा आदिवासी तालुका असल्याने आजही अनेक नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. जिल्हा परीषद व आरोग्य विभागाने स्थानिक आदिवासी बोली भाषेत प्रचार-प्रसार, जनजागृती केली आहे. त्यामुळे तालुक्यातील लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होत आहे. मात्र आरोग्य विभागाच्या ढिसाळ, नियोजन शून्य कारभारामुळे लसीकरण केंद्रावरून लसवतांना माघारी फिरावे लागत असल्याचे विक्रमगड तालुक्यातील लसीकरण केंद्रावर पहावयास मिळत आहे.

संभाव्य तिसरी लाटेची शक्यता बघता १८ ते ४४ व ४५ वयापुढील अशा तालुक्यातील वयोगटातील लोकांसाठी गणपती सणाआधी ग्रामपंचायतनिहाय लसीकरण मोहिम राबवण्याची मागणी विक्रमगड तालुक्यातून केली जात आहे. तालुक्यात सध्या प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा, प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा, प्राथमिक आरोग्य कुरंझे येथे ४५ वयोगटापुढील तसेच दुसरा डोस बाकी असलेल्या नागरिकांसाठी लसीकरण सुरु आहे. मात्र, पहिल्यां व दुसरा डोस याबद्दल आरोग्य विभागाकडून नागरिकांना योग्य माहिती दिली जात नसल्याने लसीकरणाच्या चौकशीसाठी १०-१५ किलोमीटर अंतराने असलेल्या लसीकरण केंद्रावर लसवतांचे हेलपाटे होत आहेत.

- Advertisement -

लसीकरणाला तालुक्यात चांगला प्रतिसाद असतांना आरोग्य विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे तालुक्यातील लस घेणे बाकी असलेल्या नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संभाव्य तिसरी लाट रोखायची असेल तर विक्रमगड तालुक्यात ग्रामपंचायत निहाय वेगाने लसीकरण गरजेचे असून आरोग्य विभागाचा ढिसाळ व नियोजन शून्य कारभार सुधारण्याची मागणी केली जात आहे.

मी माज्या पत्नीने कोवॅक्सिनचा पहिला डोस २८ दिवसांपूर्वी घेतला आहे. आज दुसऱ्या डोससाठी विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात गेलो असता दहा नागरीकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने सोमवारी या, असे तेथील कर्मचाऱ्याने सांगितले.
– बबन सांबरे, नागरीक

- Advertisement -

विक्रमगड तालुक्यातील कातकरी समाज आजही बहुसंख्येने लसीकरणापासून वंचित आहे. कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी आरोग्य विभागाने तातडीने नियोजन शून्य कारभार सुधारून गणपती सणाआधी विक्रमगड तालुक्यात ग्रामपंचायतनिहाय वेगाने लसीकरण करायला हवे.
– तुषार सांबरे, पालघर जिल्हा उपाध्यक्ष, श्रमजीवी संघटना

उद्या तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा, प्राथमिक आरोग्य केंद्र तलवाडा, प्राथमिक आरोग्य कुरंझे येथे १८-४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण करण्यात येणार आहे. लसीकरणसाठी ऑनलाईन नोंदणी पद्धतीने होत असते. वरिष्ठ कार्यालयाकडून ज्याप्रमाणे सूचना येतील त्याप्रमाणे महिलांसाठी किंवा १८-४४ किंवा ४५ वयोगटावरील नागरिकांसाठी लसीकरण केले जात आहे.
– डॉ. श्रीकांत कुंलकर्णी, तालुका आरोग्य अधिकारी, विक्रमगड

डोस उपलब्ध होतील त्याप्रमाणे लसीकरण करण्यात येत आहे. उद्या १८-४४ वयोगटातील नागरीकांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मलवाडा येथे प्रथम डोस व द्वितीय डोस यासाठी तीनशे डोस उपलब्ध झाले आहेत.
– डॉ. विजय ठक्कर, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र मलवाडा

हेही वाचा –

खूषखबर! आशा सेविकांच्या मोबदल्यात वाढ; राज्य मंत्रिमंडळाचे ६ महत्त्वाचे निर्णय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -