घरपालघरवसईतील वाल्मिकीनगर समस्यांच्या दुष्टचक्रात

वसईतील वाल्मिकीनगर समस्यांच्या दुष्टचक्रात

Subscribe

तुंबलेली शौचालये, पराकोटीची अस्वच्छता, रस्तोरस्ती साचलेला कचरा, पावसामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा आणि पथदिव्यांअभावी परिसरात रात्री असलेला अंधार अशा दुष्टचक्रात वसईतील वाल्मिकीनगर हा आदिवासीबहुल भाग सापडला आहे.

तुंबलेली शौचालये, पराकोटीची अस्वच्छता, रस्तोरस्ती साचलेला कचरा, पावसामुळे रस्त्याची झालेली दुर्दशा आणि पथदिव्यांअभावी परिसरात रात्री असलेला अंधार अशा दुष्टचक्रात वसईतील वाल्मिकीनगर हा आदिवासीबहुल भाग सापडला आहे. याबाबत अनेकदा वसई-विरार महापालिकेकडे तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याची खंत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. वसईतील वाल्मिकीनगर हा ५०० लोकवस्तीचा भाग आहे. यातील बहुतांश लोक हे आदिवासी समाजातून आहेत. हा भाग वसई-विरार महपालिकेच्या ‘आय’ प्रभागांत मोडतो. मात्र या प्रभागाला कोणत्याही सुविधा पुरवण्यात येत नसल्याने येथील नागरिकांत वसई-विरार महपालिकेप्रती नाराजी आहे. या परिसरात आधीच रस्त्याची वानवा आहे. तर त्या रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडले आहेत. त्यात चिखल झाला आहे. हा परिसर झोपडपट्टीने व्यापलेला असल्याने रस्त्यारस्त्यावर कचरा साचलेला आहे. मात्र महापालिकेकडून हा कचरा उचलला जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.

परिसरातील गटारे तुंबल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. याहूनही वाईट अवस्था येथील सार्वजनिक शौचालयांची आहे. शौचालये तुंबल्याने पराकोटीची अस्वच्छता आणि दुर्गंधी परिसरात पसरत असून यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची भीती आहे. विशेषकरून परिसरात पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या सुमारास शौचाला जाणाऱ्या महिलांचा प्रचंड कोंडमारा होतो. शिवाय अंधारामुळे सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होत असल्याचे महिलांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

हा परिसर गरीब लोकवस्तीचा आहे. स्थानिक नगरसेवक अथवा अन्य लोकप्रतिनिधीही या गरीबांच्या समस्यांकडे लक्ष देत नाहीत. महापालिकेकडे नागरिकांनी अनेक तक्रारी केलेल्या आहेत. मात्र महापालिकाही दखल घेताना दिसत नाही. लोकप्रतिनिधी आणि नगरसेवक फक्त मतदानाकरता येथील नागरिकांना गळ घालण्याकरता येतात.
– तसनीफ नूर शेख, उपाध्यक्ष, वसई भाजप अल्पसंख्याक सेल

महावितरणने काही महिन्यापूर्वी येथील रस्त्यावर पथदिवे लावले आहेत. मात्र काही दिवसांपासून हे दिवे बंद आहेत. गटारांवरील झाकणे तुटलेली असल्याने रात्रीच्यावेळी अपघात होण्याची संभावनादेखील व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे महापालिकेने या भागात पिण्याच्या पाण्याची सोय केली असली तरी पाण्याला ‘फोर्स’ नसल्याने महिलांचा संपूर्ण दिवस पाणी भरण्यात जात असल्याचे दुःख येथील महिला व्यक्त करतात. दरम्यान, वाल्मिकीनगर मागील काही महिने या समस्यांच्या दुष्टचक्रात असताना वसई-विरार महापालिका मात्र याकडे लक्ष देत नसल्याचे येथील महिला सांगतात. याबाबत महापालिकेकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र महापालिका ढिम्म असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

TMC कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! सातवा वेतन आयोग लागू

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -