घरपालघरकान्द्रेभूरे गावात शिक्षकांविना भरली शाळा; व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांनी शिकवले

कान्द्रेभूरे गावात शिक्षकांविना भरली शाळा; व्यवस्थापन समिती, ग्रामस्थांनी शिकवले

Subscribe

अखेर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी शाळा भरवून विध्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

तब्बल दीड वर्षांनी वर्षांनी सुरू झालेल्या पालघर जिल्ह्यातील कान्द्रेभूरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन्ही शिक्षकांना जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामात नेमल्याने शाळेत हजर राहू शकले नाहीत. अखेर शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थांनी शाळा भरवून विध्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे दिल्याचा प्रकार समोर आला आहे. राज्य सरकारने सोमवारपासून शाळा सुरु करण्यास परवानगी दिली. त्यानुसार कान्द्रेभुरे जिल्हा परिषदेच्या शाळेचीही घंटा वाजली. पण, दोन्ही शिक्षक निवडणुकीच्या कामावर गेल्याने शाळा कशी भरवली जाणार याची विद्यार्थी आणि पालकांना चिंता लागली होती. पण शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांनी पुढाकार घेवून कोविड नियमांचे पालन करून चक्क शिक्षकांविनाच शाळा भरवल्याचा प्रकार सोमवारी कान्द्रेभूरे भागात घडल्याने जिल्ह्यातील शिक्षण विभागाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

प्रशासनाकडून या शाळेवर नेहमीच अन्याय होत आहे. ऐनवेळी दोनही शिक्षकांना निवडणुकीच्या कामात व्यस्त करण्याचे नेमके कारण काय? जर दोन्ही शिक्षकांना निवडणुकीच्या कामात नेमायचेच होते. तर शाळा बंद राहू नये, याकरता केंद्रातर्गत शाळेवर दुसऱ्या शिक्षकांची नेमणूक करायला हवी होती.
– विष्णू पाटील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती

- Advertisement -

महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार इयत्ता ५ वी ते ८ वीचे वर्ग ४ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे घोषित झाले. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वत्र पालक व विद्यार्थी यांच्यात शाळेत जाण्यासाठी सर्वोतोपरी लगबग सुरू झाली. मात्र, या सर्वाला अपवाद ठरली ती पालघर जिल्ह्यातील सफाळे येथील कान्द्रेभूरे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थी. माकणे केंद्रातर्गत येणाऱ्या या शाळेत इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग भरवले जात असून ४ पदे मंजूर असताना केवळ दोनच शिक्षक शाळेत कार्यरत आहेत. अशातच त्यातील एक महिला शिक्षिका मागील १० महिन्यांपासून शाळेचा पूर्ण भार सांभाळत आहेत. तर एका शिक्षकाची २ महिनेपूर्वी शाळेत तात्पुरती अध्यापनासाठी नेमणूक केली आहे.

अशातच या शाळेतील दोन्ही शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या कामात नेमले गेल्याने शाळा सुरू कशी होणार?, हा प्रश्न पालक व विद्यार्थी यांना पडला होता. अखेर कान्द्रेभूरे ग्रामपंचायत सदस्य अरुण पाटील, पंचायत समिती सदस्य तुकाराम सुमडा, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू पाटील, पोलीस पाटील अनिशा पाटील, शाळेसाठी मदत करणारे दुर्गेश, करण, वृत्तिका, स्नेहा या सर्वांनी कोविड नियमांचे पालन करत शाळा सुरू करून शिक्षणाचे धडे गिरवले. यासंदर्भात, अधिक माहिती घेण्यासाठी पालघर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी लता सानप यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. दोनच शिक्षक असताना त्यांची निवडणुक कामासाठी नियुक्ती झाल्यानंतर शिक्षण खात्याने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे होते. असे असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षण खात्याचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

Parambir Singh : परमबीर सिंह बनावट पासपोर्टद्वारे भारतातून पळाल्याचा तपास यंत्रणांना संशय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -