घरपालघरआझाद चौक ते दर्गा रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांत वाढ

आझाद चौक ते दर्गा रस्त्याला पडलेल्या खड्डयांमुळे अपघातांत वाढ

Subscribe

तसेच झालेली धूळ यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

जव्हार: जव्हार शहरात सर्वत्र खडखड नळ पाणीपुरवठा योजनेतील नळ जोडणीचे काम प्रगतीपथावर आहे. पहिल्या टप्प्यात ही योजना पूर्ण झाली असली तरी,पाईपलाईन करिता रस्ता खोदल्यानंतर , तो रस्ता पुन्हा पूर्ववत होणे गरजेचे आहे. असे असताना शहरातील पाच बत्ती नाका, आझाद चौक ते दर्गा रस्त्याच्या दुतर्फा खडखड नळ पाणी योजने करिता रस्ता खोदून त्यात पाईप बसविण्यात आल्या आहेत. हे काम पूर्ण देखील झाले आहे. मात्र रस्त्याला पडलेले खड्डे आणि माती वर आल्याने वाहनांना खडखड करत प्रवास करावा लागत आहे. तसेच झालेली धूळ यामुळे या भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे दुचाकी स्वार पडून जखमी झाले तर आहेतच, पण अबाल वृध्द देखील अपघात होऊन पडण्याच्या घटना घडल्या आहेत, कोणतेही वाहन या रस्त्यावरून गेले असता ,आस पासच्या परिसरात राहत असलेल्या नागरिकांना धुळीचा दैनंदिन सामना करावा लागत आहे. या धुळीमुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाचे आजार देखील येथील नागरिकांना जडले आहेत. यावर स्थानिक नगर परिषद प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी जोर धरीत आहे. पाच बत्ती नाका ते मस्जिद रस्ता हा नियमित वापरात असल्याने येथे पादचार्‍यांची व वाहनांची नेहमीच रेलचेल असते. मस्जिद परिसर असल्याने मुस्लीम धर्मियांकरिता हा रस्ता अतिशय महत्त्वाचा असून नगरपरिषद प्रशासनाने या रस्त्याचे काम करावे अथवा खड्डे बुजून धूळ उडणार नाही, याचा बंदोबस्त करावा अशा प्रतिक्रिया उमटत आहेत.

- Advertisement -

पाच बत्ती नाका ते मस्जिद रस्त्या लगत असलेल्या वस्तींना खडखड नळ पाणी योजनेचे कनेक्शन देत असताना रस्त्याची खोदाई करण्यात आली. रस्त्याला पडलेले खड्डे व धूळ उडणार नाही असे काम करावे, अशा सूचना ठेकेदाराला देण्यात आल्या असून रस्त्याला पडलेले खड्डे भरण्याचे काम केले जाईल.

– विशाल मोरे, अभियंता, पाणीपुरवठा विभाग.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -