घरमहाराष्ट्रPraniti Shinde : भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना का बोलता? प्रणिती...

Praniti Shinde : भिडायचं तर माझ्याशी भिडा, माझ्या वडिलांना का बोलता? प्रणिती शिंदेंचा सातपुतेंना सवाल

Subscribe

सोलापूर : लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार म्हणून माळशिरसचे आमदार राम सातपुते यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे, काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जवळ येत असल्याने दोघांनी एकमेकांच्या विरोधात जोरदार प्रचार करण्यास सुरुवात केली असून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करतानाही दिसत आहेत. राम सातपुते यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रणिती शिंदे यांचे वडील सुशीलकुमार शिंदे यांच्यावर निशाणा साधताना त्यांना मालमत्तेचा हिशेब देण्याचे आव्हान केले होते. राम सातपुते यांच्या या आव्हानाला प्रणिती शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. (If you want to fight fight with me why are you talking to my father Praniti Shindes question to Ram Satput)

हेही वाचा – Govinda : कलावंताच्या अपमानाची परतफेड करावी लागेल; मुख्यमंत्री शिंदेंचा जयंत पाटलांना इशारा

- Advertisement -

सोलापूरच्या प्रचार सभेत राम सातपुते यांचे नाव न घेता प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सुशीलकुमार शिंदे लोकांसाठी रात्रंदिवस काम करत आहेत आणि तुम्ही त्यांना हिशेब विचारता? यावरून तुमचे संस्कार कळतात. ज्यांना संस्कार दिले गेले नाहीत ते सर्व एकत्र आले आहेत. माझ्या विरोधात जे उभे आहे, त्यांना तुम्ही पार्सल म्हणता. मात्र, मी काही म्हणणार नाही. आता ते काही दिवसांपासून सुशीलकुमार शिंदे यांच्यावर बोलत आहेत. अरे भिडायचे असेल तर माझ्याशी भिडा, मी निवडणुकीला उमेदवार म्हणून उभी आहे. माझ्या वडिलांना का बोलता? असा प्रश्न प्रणिती शिंदे यांनी विचारला आहे.

प्रणिती शिंदे म्हणाल्या की, सुशीलकुमार शिंदे यांचा संघर्ष संपूर्ण सोलापुरकरांना माहिती आहे. ज्या माणसाने आयुष्यभर संघर्ष केला, त्याच्याबद्दल असे बोलायला लाज वाटायला पाहिजे. ते जरी बोलले तरी मी त्यांच्या वडिलांवर कधी बोलणार नाही. कारण आपण सुसंस्कृत लोक आहोत. त्यांना जर बोलायचे असेल तर माझ्या कामाबद्दल बोला. गेले 15 वर्ष लोक मला निवडून देत आहेत. तरीही तुम्ही म्हणता की संघर्ष केला नाही. हा माझा नाही तर लोकांचा अपमान आहे, असा हल्लाबोल प्रणिती शिंदे यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Harish Salve : न्याय व्यवस्थेवर विशेष गटाचा दबाव; हरीश साळवेंसह 600 हून अधिक वकिलांचे CJI यांना पत्र

काय म्हणाले राम सातपुते?

प्रचार सभेत बोलताना राम सातपुते म्हणाले की, माझे आई-वडील ऊसतोड कामगार होते. आम्ही साध्या झोपडीत राहायचो. माझे शिक्षण बी. टेकपर्यंत झाले असून पत्नीनेही बी. टेकपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. सध्या तिची आयटी कंपनी आहे. बँकेचे कर्ज काढून आम्ही बंगला बांधला आहे. त्याचा संपूर्ण हिशेब द्यायला मी तयार आहे. मात्र, वर्षानुवर्षे सत्तेत राहिलेल्या सुशीलकुमार शिंदे यांनीही त्यांनी कमावलेल्या मालमत्तेचा हिशेब द्यावा, असे आव्हान राम सातपुते यांनी केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -