घरपालघरग्रामीण जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक शाखा

ग्रामीण जिल्ह्यात स्वतंत्र वाहतूक शाखा

Subscribe

१ ऑगस्ट २०१४ साली ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. २०१४ पासून अद्यापपर्यंत पालघर जिल्हा पोलीस दलासाठी वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आलेली नव्हती.

पालघर : पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी स्वतंत्र वाहतूक शाखेचे कार्यालय दसर्‍याच्या मुहूर्तावर सुरु करण्यात आले. त्यासाठी ५३ अधिकारी, कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीनंतर वाहतूक शाखा प्रत्यक्षपणे कामकाजाला सुरुवात करणार आहे. १ ऑगस्ट २०१४ साली ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली. २०१४ पासून अद्यापपर्यंत पालघर जिल्हा पोलीस दलासाठी वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आलेली नव्हती. विद्यमान पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिवसेंदिवस पालघर जिल्ह्यात वाढती वाहतूक कोंडी व रस्ते अपघात यावर नियंत्रण करणेकरीता स्वतंत्र वाहतूक शाखा कार्यान्वित करण्याचे नियोजित केले. याकरता वरिष्ठांच्या पुर्वपरवानगीने वाहतूक शाखेची निर्मिती करण्यात आली. वाहतूक शाखेसाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक आसिफ बेग यांच्यासह एकूण ५३ पोलीस अंमलदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहतूक शाखेसाठी नेमणूक करण्यात आलेले प्रभारी अधिकारी आसिफ बेग यांचेसह एकूण ३२ पोलीस अंमलदारांचे सात दिवसांचे वाहतूकीचे प्रशिक्षणही पूर्ण करण्यात आले असून उर्वरीत २१ पोलीस अंमलदारांचे प्रशिक्षण हे या आठवड्यात पूर्ण करण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे प्रत्यक्षात कामकाज हे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीनंतर सुरू करण्यात येणार आहे. दसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते वाहतूक शाखेच्या कार्यालयाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले आहे. अपर पोलीस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपअधिक्षक शैलेश काळे, नियंत्रण कक्षाचे प्रभारी अधिकारी विश्वजीत बुलबुले, जिल्हा विशेष शाखेचे प्रभारी सुधीर संखे, स्थानिक गुन्हे शाखेचे अनिल विभुते, आसिफ बेग यावेळी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -