घरपालघरतालुक्यातील बैल, गाय, वासरूंना रोगाची लागण

तालुक्यातील बैल, गाय, वासरूंना रोगाची लागण

Subscribe

विक्रमगड तालुक्यात सध्या बैल, गाय, वासरू या गुरांना रोगाची लागण होण्यास सुरूवात झाल्याने पशुपालक व शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

विक्रमगड तालुक्यात सध्या बैल, गाय, वासरू या गुरांना रोगाची लागण होण्यास सुरूवात झाल्याने पशुपालक व शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. गुरांच्या अंगावर गाठी येणे, फोड येणे व त्यानंतर जखमीत रूपांतर होणे अशी या आजाराची लक्षणे दिसतात. पशुवैद्यकीय विभागाने याबाबत तातडीने गुरांवर उपचार करावा असी मागणी केली. मात्र तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने शेतकरी व पशुपालक वर्गाला खासगी पशु डॉक्टरांना उपचारासाठी आणावे लागते. या खासगी पशु डॉक्टरांकडून जास्तीची उपचार फी आकारली जात असल्याने शासनाने रिक्त पशुवैद्यकीय पदे तात्काळ भरावी, अशी मागणी केली जात आहे.

माझ्या दोन जनावरांच्या अंगावर गाठी, फोड, व जखम झाल्याने पशुवैद्यकीय विभागाकडे माहिती दिली. पशु डॉक्टर येऊन उपचार केला. मात्र हे डॉक्टर शासकीय होते की खासगी होते माहित नाही. त्यांनी माझ्याकडून प्रत्येकी २२० रू प्रमाणे दोन जनावरांचे ४४० रूपये घेतले. ही फी आम्हा शेतकऱ्यांना आजच्या वेळेला जास्त असल्याने शासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
– मंगेश कान्हात, शेतकरी, सवादे

- Advertisement -

तालुक्यातील ग्रामीण भागात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहेत. खांड, जनाठेपाडा, जांभा, सवादे, साखरे, वाकी, वेहलपाडा, सातकोर, व तालुक्यात इतर भागात जवळपास शंभर जनावरांना विविध रोगाने ग्रासल्याने जनावरे आजारी पडू लागली आहेत. यामुळे येथील शेतकरी व पशुपालक यांची चिंता वाढू लागली आहे. भात लागवडीच्या काळातच शेती नांगरणारे बैल आजाराने ग्रासल्याने शेतकऱ्यांची मोठी कोंडी झाली होती. गुरांच्या अंगावर गाठी व फोड होऊन जखम होत असल्याने दुध उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याने शेतकरी व पशुपालक मेटाकुटीला आले आहेत. शासनाकडून विक्रमगड तालुक्यातील दादडे, तलवाडा, साखरे, कुंर्झे या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय अधिकारी रिक्त पदे आहेत. तर मलवाडा, भोपोली, तलवाडा येथील शिपाई पदेही रिक्त आहेत. त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

विक्रमगड तालुक्यात जवळपास १०० जनावरांवर उपचार करण्यात आला असून जनावरांचे रक्त नमुने राज्यस्तरीय रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल येणे बाकी असल्याने रोग निश्चित झालेला नाही. पदे रिक्त असताना सध्दा पशुवैद्यकीय विभागाकडून रोग नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
– ए. एस. कारले, पशुवैद्यकीय अधिकारी, विक्रमगड

- Advertisement -

खासगी पशु डॉक्टरांकडून होणारी आर्थिक पिळवणूक थांबावी. पशुवैद्यकीय अधिकारी व पशु डॉक्टरांच्या रिक्त पदांचा भार सध्या कार्यरत पशु डॉक्टरांवर पडत आहे. तालुक्यातील रोग नियंत्रण आणण्यासाठी असलेले पशु डॉक्टर करीत असून त्यांची मेहनत तोकडी पडत आहे. म्हणूनच रिक्त पदे भरून पशुवैद्यकीय सेवा तातडीने सुरळीत करावी, अशी मागणी केली जात आहे.

हेही वाचा –

UGC NET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर! अर्ज प्रक्रिया सुरू,वाचा संपूर्ण डिटेल्स

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -