घरताज्या घडामोडीUGC NET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर! अर्ज प्रक्रिया सुरू,वाचा संपूर्ण डिटेल्स

UGC NET 2021 परीक्षेच्या तारखा जाहीर! अर्ज प्रक्रिया सुरू,वाचा संपूर्ण डिटेल्स

Subscribe

५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत फी भरता येणार आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून यूजीसी नेट परीक्षेच्या (UGC NET EXAM 2021) तारखा जाहीर करण्यात आल्या आहे. (UGC NET Exam Dates Announced)  डिसेंबर २०२०सत्रातील परीक्षा आणि जून २०२१ सत्रातील परीक्षा एकत्र करण्यात आल्या असून नेट परीक्षा ६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर रोजी होणार आहेत. कोरोनामुळे डिसेंबर २०२० सत्रातील परीक्षा आणि जून २०२१च्या परीक्षेचे अर्ज करण्यात उशिर झाला. त्यामुळे दोन्ही सत्रांच्या परीक्षा एकत्र घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या यूजीसी नेट परीक्षांचे अर्ज भरण्याची प्रक्रीया सुरू करण्यात आली असून इच्छुक उमेदवार ugcnet.nta.nic किंवा nta.ac.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. ५ सप्टेंबर २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर ६ सप्टेंबर २०२१ पर्यंत फी भरता येणार आहे.

याआधी डिसेंबर २०२० सत्राची यूजीसी नेट परीक्षा ही २ मे २०२१ ते १७ मे २०२१ रोजी होणार होती. मात्र कोरोना महामारीमुळे ही परीक्षा स्थगित करण्यात आली. यूजीसी नेट डिसेंबर २०२०च्या परीक्षेची अर्ज प्रक्रिया फेब्रुवारी – मार्च २०२१ पर्यंत सुरू होती. ज्यांनी यूजीसी नेट डिसेंबर २०२० परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन केले मात्र ते अर्ज सबमिट करू शकले नाहीत ते देखील आता https:\\ugcnet.nta.nic.in किंवा www.nta.ac.in वर जाऊन अर्ज पूर्ण करू शकतात.

- Advertisement -

परीक्षेचे आयोजन

६ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबरला होणारी यूजीसी नेट परीक्षा दोन शिफ्टमध्ये आयोजित करण्यात आली आहे. पहिली शिफ्ट सकाळी ९ ते १२ वाजेपर्यंत असेल तर दुसरी शिफ्ट दुपारी ३ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत असेल. परीक्षेचे आयोजन कॉम्प्युटरवर CBT मोडमध्ये घेण्यात येणार आहे. परीक्षेत दोन पेपर असून त्यात बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येणार आहेत. दोन्ही पेपरमध्ये १५० पश्न विचारण्यात येतील.

महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा 

  • अर्ज प्रक्रिया – १० ऑगस्ट २०२१ ते ५ ऑगस्ट
  • फी भरण्याची शेवटची तारीख – ६ सप्टेंबर २०२१
  • अर्ज दुरुस्त करण्याची तारीख – ७ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर
  • परीक्षेची तारीख – ६ ऑक्टोबर २०२१ ते ११ ऑक्टोबर २०२१

हेही वाचा – Himachal Landslide: किनौर येथे प्रवाशांनी भरलेल्या बसवर दरड कोसळली, ढिगाऱ्याखाली ५०-६० जण अडकल्याची भिती

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -