घरताज्या घडामोडीMarburg Virus: वटवाघुळामुळे पुन्हा जगावर संकट! १५५ जणांना मारबर्ग व्हायरसचा संसर्ग -...

Marburg Virus: वटवाघुळामुळे पुन्हा जगावर संकट! १५५ जणांना मारबर्ग व्हायरसचा संसर्ग – WHO

Subscribe

कोरोना व्हायरसचं संकट असतानाच आता अजून एका व्हायरसचं संकट जगावर घोघावत आहे. पश्चिम आफ्रिकेचा देश गिनीमध्ये (Guinea) मारबर्ग व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली होती. त्यानंतर आता गिनी देशात १५५ जणांना मारबर्ग व्हायरसची लागण झाल्याची शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे. कोरोना आणि इबोला व्हायरसप्रमाणे मारबर्ग व्हायरसची काही लक्षणे आहेत. महत्त्वाची गोष्टी म्हणजे मारबर्गच्या संसर्गानंतर रक्तस्राव होण्यास सुरू होते, असे समोर आले.

मारबर्ग व्हायरस देखील वटवाघुळातून पसरला आहे, असे म्हटले जातेय. त्यामुळे या व्हायरस पसरण्याचा वेग जास्त आहे. मारबर्ग व्हायरसमुळे मृत्यू होण्याची शक्यता ८८ टक्क्यांपर्यंत आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉक्टर मात्शिदिसो मोएती म्हणाले की, मारबर्ग व्हायरस दूर-दूरपर्यंत पसरण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला याची साखळी रोखणे गरजेचे आहे.

- Advertisement -

काय आहेत लक्षणे? 

सध्या मारबर्ग व्हायरसचा फैलाव पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये जास्त होत आहे. इबोला व्हायरसने देखील आफ्रिकेमध्ये चांगलाच कहर केला होता. आता या नव्या व्हायरस तणाव वाढवत आहे. हा व्हायरससुद्धा व्यक्तीच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या द्रव्यपदार्थांपासून आणि वस्तूच्या संपर्कातून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचतो. या व्हायरसमुळे तीव्र ताप, डोकेदुखी आणि स्नायू दुखण्यास सुरुवात होते. त्यानंतर संसर्गाच्या तीसऱ्या दिवशी अतिसार, ओटीपोटात दुखणे, मळमळ आणि उलट्या होऊ शकतात. यादरम्यान रुग्णांचे डोळे जड होतात, चेहऱ्यात देखील बदल होतो आणि सुस्तपणा येतो. तसेच शरीरावर पुरळ आणि रक्तस्राव होणे हे गंभीर या व्हायरसच्या लक्षणांपैकी एक आहे. उलट्या, मल दरम्यान रक्तस्त्राव होतो, तर स्त्रियांमध्ये नाक, हिरड्या आणि गुप्तांगातून रक्तस्त्राव देखील होतो. तसेच ऑर्काइटिसमध्ये सूज येणे, चिडचिडपणा आणि जळजळसुद्धा होऊ शकते. हा व्हायरस ८ ते ९ दिवसांत रुग्णाचा जीव घेऊ शकतो, असे सांगण्यात आले आहे.


हेही वाचा – कोरोना लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान मोदींचा फोटो का आहे?, केंद्राने दिले स्पष्टीकरण

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -