घरपालघरविक्रमगडमधील नालीपाडा येथील पुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी

विक्रमगडमधील नालीपाडा येथील पुलाच्या निकृष्ट कामाची चौकशी

Subscribe

ओंदे अंतर्गत येणाऱ्या नालीपाडा येथील पुलाची चार महिन्यापुर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. ही दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याने चार महिन्यात यापुलाची दुरवस्था झाली आहे. हा पूल जिल्हा परिषद अंतर्गत बांधण्यात आला आहे.

औंदे गावातील नालीपाडा येथील पूलाची वारंवार दुरुस्ती करूनही निकृष्ट कामामुळे पूलाची दुरवस्था झाली आहे. याच्या तक्रारी आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या बांधकाम समिती सभापती शीतल धोडी  यांनी पाहणी करून चौकशीचे आदेश दिले आहेत. ग्रुप ग्रामपंचायत ओंदे अंतर्गत येणाऱ्या नालीपाडा येथील पुलाची चार महिन्यापुर्वी दुरुस्ती करण्यात आली होती. ही दुरुस्ती निकृष्ट दर्जाची असल्याने चार महिन्यात यापुलाची दुरवस्था झाली आहे. हा पूल जिल्हा परिषद अंतर्गत बांधण्यात आला आहे. याआधीही या पुलावर जिल्हा परिषद अंतर्गत पूल दुरुस्तीचे काम करण्यात आले आहे. असे असतांना पुन्हा या पुलावर चार महिन्यापूर्वी ग्रामपंचायत निधीमधून दुरुस्तीचे काम करण्यात आल्याचे याबाबत येथील ग्रामस्थांनी या भागातील जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट यांना तक्रार केली होती.

धोडी यांनी त्यानंतर स्वतः अधिकाऱ्यांसोबत जागेवर जाऊन पुलाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत कासट आणि पंचायत समिती सदस्या अंजली भोये, जिल्हा परिषद सदस्य गणेश कासट उपस्थित होते. यावेळी धोडी यांनी पुलाच्या कामाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. यात दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही धोडी यांनी ग्रामस्थांना दिली.

- Advertisement -

ओंदे ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांच्या गरजेच्या विकास कामावर निधी खर्च न करता नको असलेल्या कामावर निधी खर्च झालेल्या निदर्शनास येत आहे. या पुलाच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट असल्याचे दिसत आहेत.
– गणेश कासट, जिल्हा परिषद, सदस्य

नालीपाडा येथील पुलाच्या दुरुस्तीचे काम पाहिले आहे. निकृष्ट दर्जाचे काम असल्याचे दिसत आहे. या पुलावर खर्च करण्यात आलेल्या निधीच्या चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.
– शीतल धोडी, बांधकाम समिती, सभापती

- Advertisement -

मला अजून ओंदे ग्रामपंचायतीचा कार्यभार देण्यात आलेला नाही.  ग्रामपंचायतीकडून या पलाच्या दुरुस्तीसाठी किती खर्च करण्यात आला याबाबत मला काही सांगता येणार नाही.
– संदीप सुतार, ग्रामसेवक, ग्रामपंचायत, ओंदे

नाली पाडा या पुलाची मी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली आहे. संबंधितांना याबाबत मी निर्देश दिले आहेत. मात्र या पुलाच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतीकडून किती खर्च करण्यात आला याबाबत मला सांगता येणार नाही.
– ईश्वर पवार, सहाय्यक गट विकास अधिकारी, पंचायत समिती, विक्रमगड

मी या पुलाच्या दुरवस्थेबाबत पाहणी केली आहे. या पुलाचे खड्डे भरण्यास सांगितले आहे. या पुलाच्या दुरुस्तीवर किती खर्च झाला हे ग्रामपंचायत दप्तर बघितल्यानंतरच सांगता येईल.
– मनोज अंभोरे, शाखा अभियंता, बांधकाम विभाग

हेही वाचा –

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -