घरपालघरपालघरमध्ये ल्मपी आलाय ! हजार गुरांचे चक्राकार पद्धतीने लसीकरण

पालघरमध्ये ल्मपी आलाय ! हजार गुरांचे चक्राकार पद्धतीने लसीकरण

Subscribe

निकाल अद्यापही प्रतीक्षेत असून या गावातील पाच किलोमीटर अंतरावरील परिघात सुमारे १७२६ गुरांचे लसीकरण करण्यात आले.

पालघर : पालघर जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये लम्पी रोगाचा शिरकाव झाला असून त्याचा परिणाम दुधाळ जनांवर झाल्याचे दिसून येत आहे. हा व्हायरस गाय सदृश जनावरांमध्येच आढळून आल्याने दुग्ध व्यावसायिकांनी धास्ती घेतली आहे. पालघर जिल्ह्यात एकूण २ लाखांच्या वर गाय वर्गातील नर आणि मादी असून ज्या ठिकाणी लागण झाली आहे त्या परिसरातील पाच किलोमीटर परिघामध्ये येणार्‍या गुरांचे लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. मात्र, या रोगाचा फैलाव झाल्यानंतर पालघर जिल्ह्याच्या पशुसंवर्धन कार्यालयाची झोपच उडाल्याचे दिसत आहे.
सर्वप्रथम वाडा तालुक्यातील कोंडले येथे या लम्पी रोगाचा प्रादुर्भाव वैभव पुंडलिक चौधरी यांच्या जनावरावर आढळून आला. सध्या तरी या जनावरावर उपचार करण्यात आले असून उपचारांना प्रतिसाद देत असल्याचे समजते. कोंडले परिसरातील उचाट, उसर, सापरोंडे, मसवल आणि कोंडले येथील सुमारे ९७७ गुरांवर गोट पॉक्सचे लसीकरण करण्यात आले. वसई तालुक्यातील राजावली, टिवरी सनातन गोशाळेमध्ये ३ ते ४ गुरांना ही लागण झाली असून त्यांचे लम्पी सदृश रक्ताचे नमुने पुणे येथे रोगनिदान प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. त्यांचे निकाल अद्यापही प्रतीक्षेत असून या गावातील पाच किलोमीटर अंतरावरील परिघात सुमारे १७२६ गुरांचे लसीकरण करण्यात आले.

पालघर तालुक्यातील उमरोली पडघे येथे तीन जनावरांना बाधा झाल्याची लक्षणे आढळून आली. त्यांचेही रक्तनमुने पाठविण्यात आले असून या भागातील १८२४ जनावरांना लसीकरण करण्यात आले. तलासरी आमगाव येथे ५ जनावरांना ही लागण झाली आहे. प्रतिबंधक उपाय म्हणून लसही देण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याला एकूण ११ हजार लस मिळविण्यात यश आले असून सुमारे ३ हजार गुरांना आतापर्यंत लसीकरण करण्यात आले आहे. उर्वरित लसीकरण टप्प्याटप्प्याने सुरू असून आतापर्यंत एकही जनावर दगावले नसल्याचे सांगण्यात आले. लागवण झालेल्या गावापासून पाच किलोमीटर अंतरावरील जनावरांवर रिंग व्हॅक्सीन करण्यात येत असून कीटक नाशक फवारणीही करण्यात आली आहे. पालघर जिल्ह्याच्या सीमेवर कडक पहारा देण्यात आला असून जनावरांची ने-आण करण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

- Advertisement -

चौकट:
कर्मचार्‍यांची कमतरता:
पालघर जिल्हा परिषद अंतर्गत पशुसंवर्धन विभागात २६९ पदांपैकी तब्बल १२५ पदे रिक्त असून लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर काम करणे अशक्य असल्याचे दिसून आले. या सव्वाशे पदांचा कार्यभार कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांवर येत असून पशुधन विकास अधिकारी, सहायक पशुसंवर्धन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक, ड्रेसर आणि परिचरांचा समावेश आहे. सध्या १४४ पदेच कार्यरत आहेत.

प्रतिक्रिया:
बाधा झालेल्या जनावराचे त्वरित विलगीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून तसे न केल्यास हा व्हायरस झपाट्याने पसरू शकतो. गोमाशी माशा, गोचीड, चिलटे आदींमार्फत पसरण्याची भीती असून एका जनावरापासून अनेक जनावरांना त्याची बाधा जलदगतीने होते.जनावराला खूप ताप येणे, भूक मंदावणे, चारापाणी कमी करणे, शरीरावर गाठी येणे, दुधाळ जनावरांचे दूध कमी होणे, पायांना सूज येणे, आदी लक्षणे दिसताच जवळच्या पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा.
डॉ. पंजाब चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद पालघर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -