घरपालघरअंगणवाडी कर्मचार्‍यांकडून मोर्चा व निदर्शने

अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून मोर्चा व निदर्शने

Subscribe

म्हणून त्यांना शासकीय वेतनश्रेणी, भत्ते, सेवासमाप्ती लाभ पूर्वलक्षीप्रभावाने देण्यात यावेत. याची अंमलबजावणी होईपर्यंत अंगणवाडी कर्मचार्‍यांना सध्या मिळत असलेल्या वेतनात १२०००/- रूपयांची अंतरिम वेतनवाढ देण्यात यावी, अशी व यासारखी इतर मागणी यावेळी अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून करण्यात आली.

पालघर : पोषण, शिक्षण व आरोग्य क्षेत्रात महत्वाची जबाबदारी पार पाडत असलेल्या व कोरोना लॉकडाउनच्या काळात अविरतपणे लाभार्थ्यांना सेवा देणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून त्यांच्या विविध मागण्यांसाठी पालघर जिल्हा परिषदेच्या बाहेर मुख्य गेटवर मोर्चा काढण्यात आला. यादरम्यान ही निदर्शने करण्यात आली. पालघर जिल्ह्यातील काना-कोपर्‍या पासून आलेल्या सुमारे १५०० अंगणवाडी कर्मचार्‍यांनी या निदर्शनात आपला सहभाग दाखवला व यावेळी त्यांच्याकडून केंद्रातील मोदी सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ही करण्यात आली.
अंगणवाडी कर्मचारी या शासकीय कर्मचारी आहेत. म्हणून त्यांना शासकीय वेतनश्रेणी, भत्ते, सेवासमाप्ती लाभ पूर्वलक्षीप्रभावाने देण्यात यावेत. याची अंमलबजावणी होईपर्यंत अंगणवाडी कर्मचार्‍यांना सध्या मिळत असलेल्या वेतनात १२०००/- रूपयांची अंतरिम वेतनवाढ देण्यात यावी, अशी व यासारखी इतर मागणी यावेळी अंगणवाडी कर्मचार्‍यांकडून करण्यात आली.

यासह मानधन वाढ, शासकीय कर्मचार्‍यांच्या दर्जा, नवीन पोषण ट्रॅकर अँप (मराठीभाषेत), नवीन मोबाईल व अशा अनेक मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचार्‍यांनी जिल्हा परिषदेसह राज्यातील नवीन शिंदे- फडणवीस सरकारकडे मागणी केली आहे. यासंदर्भात अंगणवाडी कर्मचार्‍यांची महिला बाल विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचा बरोबर १४ सप्टेंबर रोजी चर्चा होणार आहे. जर या चर्चेत मागण्या मान्य झाल्यास तर ठीक, नाहीतर राज्यभरातील अंगणवाडी कर्मचार्‍यांना घेऊन मंत्रायलात मोर्चा नेण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी दैनिक आपलं महानगरच्या प्रतिनिधीशी बोलताना माहिती दिली.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांच्या थकीत प्रश्नांवर मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी संयुक्त मीटिंग घेण्याचे आश्वासन दिले आहे. राज्यातील थकीत प्रश्नांसाठी ते पत्र पाठवणार आहेत.
– राजेश सिंह, संघटक सचिव
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -