घरपालघर'माता सुरक्षित, तर घर सुरक्षित' अभियानाला जव्हार तालुक्यात सुरुवात

‘माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियानाला जव्हार तालुक्यात सुरुवात

Subscribe

ग्रामीण तथा दुर्गम भागामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या यंत्रणेतून योग्य प्रकारे सेवा देण्याचे काम सुरू आहे, तालुक्यात बर्‍याच ठिकाणी वाहने जात नाही अशा ठिकाणी डोंगरदर्‍या चढणे, नदी पार करणे, अशा परिस्थितीत सुध्दा आरोग्य सुविधा देण्यात येत आहे.

जव्हार : जव्हार तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने नवरात्रोत्सवात 18 वर्षांवरील महिला, माता, गरोदर स्त्रिया आरोग्य तपासणी, सुरक्षित व सदृढ आरोग्यासाठी समुपदेशन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान, ’माता सुरक्षित, तर घर सुरक्षित’ अभियान शासनातर्फे राबविले जात असून सोमवारी एक हजार चारशे महिलांची तपासणी करण्यात आली आहे. ग्रामीण तथा दुर्गम भागामध्ये आरोग्य विभागाच्या वतीने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध असलेल्या यंत्रणेतून योग्य प्रकारे सेवा देण्याचे काम सुरू आहे, तालुक्यात बर्‍याच ठिकाणी वाहने जात नाही अशा ठिकाणी डोंगरदर्‍या चढणे, नदी पार करणे, अशा परिस्थितीत सुध्दा आरोग्य सुविधा देण्यात येत आहे.
जव्हार तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, आरोग्य उपकेंद्र, तसेच अंगणवाडी केंद्रात आरोग्य शिबिरे घेण्यात येणार असून, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला. नवरात्रोत्सवातील तीन दिवस हे जास्तीत जास्त गर्भवती महिलांच्या सोनोग्राफीसाठी असतील. महिलांच्या आरोग्यासाठी आवश्यक त्या सर्व चाचण्या व तपासणी या काळात करण्यात येणार असून, आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक, तसेच उपचारांत्मक सुविधाही देण्यात येतील.

या अभियानामार्फत महिला व मातांची वैद्यकीय अधिकार्‍यांमार्फत तपासणी केली जाणार आहे. हिमोग्लोबीन, साखरेचे प्रमाण, लघवीची तपासणीची नियमित तपासणी केली जाणार आहे. मॅमोग्राफी, छातीचा एक्सरे, ३० वर्षांवरील सर्व महिलांची कर्करोग स्क्रिनिंग, रक्तदाब स्क्रिनिंग, मधुमेह स्क्रिनिंग केली जाणार आहे. माता व बालकांचे लसीकरण, सोनोग्राफी केली जाणार असून, आवश्यकतेनुसार औषधोपचारही केले जाणार आहेत.

- Advertisement -

कोट

माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेची जव्हार तालुक्यात सुरुवात झाले असून अठरा वर्षे वयोगटापासून पुढे सर्व महिलांनी आपल्या नजीकच्या उपकेंद्रात जावून जाऊन आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी.
डॉ.किरण पाटील,तालुका आरोग्य अधिकारी,जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -