घरपालघरतीस कोटींच्या रस्त्याची चाळण; राष्ट्रवादी काँग्रेसचे 'रास्ता रोको' आंदोलन

तीस कोटींच्या रस्त्याची चाळण; राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘रास्ता रोको’ आंदोलन

Subscribe

तीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या धुंदलवाडी ते मोडगाव रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून रस्त्यांवरील खड्यांमुळे अऩेकदा अपघात होऊ लागले आहेत.

तीस कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या धुंदलवाडी ते मोडगाव रस्त्याची दयनिय अवस्था झाली असून रस्त्यांवरील खड्यांमुळे अऩेकदा अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे निष्पापांचे जीवही जात आहेत. याकडे दुर्लक्ष करणा-या सार्वजनिक बांधकामाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम समिती सभापती काशिनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन केले.

धुंदलवाडी-हळदपाडा-मोडगाव ते उधवाला जोडणा-या रस्त्याचे काम काही वर्षांपूर्वी करण्यात आले होते. धुंदलवाडी रस्त्यासाठी तीस कोटी रुपयांचा बक्कळ निधी खर्च करण्यात आला होता. रस्त्याचा दोष दायितवाचा कालावधी अजूनही चार वर्षे शिल्लक असतानाच रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यावरून अनेक लोक प्रवास करत असतात. त्यांना पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे.

- Advertisement -

धुंदलवाडी उधवा या १० किमीच्या रस्त्यासाठी तीस कोटी एवढा मोठा निधी खर्च करण्यात आलेला आहे. परंतु काही वर्षातच रस्त्याची चाळण होऊ अपघातात वाढ होत आहे. त्यामुळे लवकरच हा रस्ता दुरुस्त करण्याची गरज आहे. सदर रस्त्यावरून अवजड वाहनेही वाहतूक करत असल्यामुळेही रस्ता खराब होतो आहे. त्यासाठी आम्ही वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला असून पालघर जिल्हाधिकारी यांनाही पत्र देऊन सदर रस्त्यावरून अवजड वाहनांची वाहतूक थांबवण्याची मागणी करणार आहोत.
– काशिनाथ चौधरी, माजी बांधकाम सभापती, जिल्हा परिषद, पालघर

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अनेक अपघात घडत असून काही लोकांना आपला जीवही गमवावा लागल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. या रस्त्यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वारंवार पत्रव्यवहार करूनसुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काशीनाथ चौधरी यांनी केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्यामुळे काशीनाथ चौधरी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनाला स्थानिकांचा चांगलाच पाठिंबा मिळाला असून शेकडो महिला व पुरुष कार्यकार्ये आंदोलनाला हजर राहिले होते. आंदोलनादरम्यान काशीनाथ चौधरी यांनी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून निषेध व्यक्त केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून येत्या १० दिवसांत खड्डे भरून रस्ता पूर्ववत करण्याचे आश्वासन मिळल्यानंतर आंदोलन स्थगित करून रास्ता मोकळा करण्यात आला.

- Advertisement -

सेलवास-खानवेलवरून येणारी अवजड वाहने दापचरी तपासणी नाका चुकवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना हाताशी धरून तलासरीवरून न जाता उधवावरून धुंदलवाडीमार्गे मार्गक्रमण करत असल्याची माहिती विश्वासू सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे यावर आळा घालून अनधिकृत होणारी वाहतूक थांबवल्यास रस्त्यांची दुरवस्थाही होणार नाही व शासनाचा महसूल ही शासनाला मिळेल असे जाणकारांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वी काशीनाथ चौधरी यांनी दोन अवजड वाहने थांबवून आरटीओ अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिली होती. त्यांच्यावर कारवाई करून प्रत्येकी ६५ हजार रुपये दंड आकारल्याची माहिती चौधरी यांनी दिली आहे.

हेही वाचा –

IND vs ENG : लोकेश राहुलची दमदार कामगिरी सुरूच; लॉर्ड्स कसोटीत शतकी खेळी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -