घरक्रीडाIND vs ENG : लोकेश राहुलची दमदार कामगिरी सुरूच; लॉर्ड्स कसोटीत शतकी खेळी

IND vs ENG : लोकेश राहुलची दमदार कामगिरी सुरूच; लॉर्ड्स कसोटीत शतकी खेळी

Subscribe

राहुलने २१२ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक केले.

भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने दमदार कामगिरी सुरु ठेवली आहे. राहुलला जवळपास दोन वर्षे कसोटी संघाबाहेर बसावे लागले होते. परंतु, इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत त्याने आव्हानात्मक परिस्थितीत महत्त्वपूर्व अर्धशतकी खेळी केली होती. त्याने चांगला फॉर्म कायम राखताना आजपासून सुरु झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी शतक झळकावले. लॉर्ड्सवर होत असलेल्या सामन्यात राहुलने २१२ चेंडूत कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक केले. त्यामुळे ८० षटकांनंतर भारताची पहिल्या डावात २ बाद २५२ अशी धावसंख्या होती. राहुल १०६ धावांवर, तर कर्णधार विराट कोहली ४० धावांवर नाबाद होता.

राहुल-कोहलीची शतकी भागीदारी

या सामन्यात राहुल आणि रोहित शर्मा या भारतीय सलामीवीरांनी अप्रतिम सुरुवात केली. या दोघांनी १२६ धावांची सलामी दिली. रोहितने उत्कृष्ट फलंदाजी करत १४५ चेंडूत ८३ धावांची खेळी केल्यावर त्याला जेम्स अँडरसनने बाद केले. अँडरसननेच मग पुजारालाही अवघ्या ९ धावांवर माघारी पाठवले. यानंतर मात्र राहुलला कर्णधार कोहलीची चांगली साथ लाभली. या दोघांना शतकी भागीदारी रचण्यात यश आले. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात ८४ धावांची खेळी करणाऱ्या राहुलने दुसऱ्या कसोटीत २१२ चेंडूत ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शतक पूर्ण केले.

- Advertisement -

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -