घरपालघरनिमित्त दिवाळी सणाचे पण आकलन ऐतिहासिक परंपरेचे

निमित्त दिवाळी सणाचे पण आकलन ऐतिहासिक परंपरेचे

Subscribe

महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड- किल्ल्यातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने चंदनसार येथील ब्राह्मण आळीतील पाध्ये पाटील कुटुंबातील मुलांनी मागील वर्षीपासून घराच्या अंगणात किल्ले साकारण्याची कल्पना आखली.

वसई: दिवाळीत किल्ला बांधला की सकारात्मकतेचै बिज मनामध्ये रुजवण्यांचे कामही आपोआप होते. पुढे हिच गोष्ट परंपरा बनत गेली आणि दिवाळीला किल्ला तयार करणे सुरु झाले. वसई -विरार परिसरात दिवाळीनिमित्त किल्ले बनवले जात असून ते आता आकर्षण ठरू लागले आहे. वसई येथील गावराईपाडा येथील रोशनी घरत आणि भावंडांनी मिळून “सिंहगड” किल्ल्याची प्रतिकृती त्यांच्या घराच्या अंगणात साकारली आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची गाथा सांगणार्‍या कोंढाणा किल्ल्याची बांधणी केली आहे. “गड आला पण सिंह गेला” अशी खंत छत्रपती शिवाजी महाराज यांनी व्यक्त करत कोंढण्याचे नामकरण सिंहगड असे केले होते. सिंहगड किल्ला हे शौर्याचे, ध्येयाचे प्रतिक मानले जाते.
विरारजवळील चंदनसार येथील पाध्ये पाटील कुटुंबातील मुले व मुलांनी दिवाळीच्या निमित्ताने प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचे साक्षीदार असलेल्या गड- किल्ल्यातून इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने चंदनसार येथील ब्राह्मण आळीतील पाध्ये पाटील कुटुंबातील मुलांनी मागील वर्षीपासून घराच्या अंगणात किल्ले साकारण्याची कल्पना आखली.

मागीलवर्षी अजिंक्यतारा किल्ला व ह्यावर्षी प्रतापगड किल्ल्याची प्रतिकृती साकारली आहे. चंदनसार गावात हा किल्ला सध्या आकर्षणाचा विषय ठरला आहे.विराज जोशी व अभिजीत जोशी यांच्या मुख्य सहभागाने व मार्गदर्शनाखाली श्रीश, श्रीया, संस्कृती, ओम, कौशल, निरजा, हर्षिता, विदिशा, वदंत , मिहीर ,गौरांग, स्वानंद , वरद , ऋग्वेद , राजदिप , विनम्रा, सई, अन्विशा, आकांक्षा यांनी हा किल्ला बनविला आहे.

- Advertisement -

दैनंदिन अनुकरणाची गरज
दिवाळीनिमित्त कित्येक ठिकाणी उत्साहात किल्ले उभारणी केली जाते आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमांना उजाळा मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या युक्तीला आणि छत्रपती शंभूराजांच्या शक्तीला उजाळा दिला जातो. त्यांच्या त्यायुक्ती आणि शक्तीचा वापर दैनंदिन जीवनासाठी केला तर?, तर नक्कीच स्वराज्यात सुराज्य उभे राहील यात शंकाच नाही. आजचा आज पाहावा, अनुभवावा आणि कालच्या इतिहासाशी तोलून पाहावा. म्हणजेच किल्ले बांधणीसोबत नव्या विचारांची बांधणी झाली पाहिजे आणि त्याला नवोन्मेषाची सांगड असली पाहिजे. या भावनेतूनच किल्ले बनवले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -