घरपालघरजिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गारेगार; सप्टेंबरपासून बंद होती एसी

जिल्हाधिकारी कार्यालय पुन्हा गारेगार; सप्टेंबरपासून बंद होती एसी

Subscribe

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा (एसी) अफाट वीज देयकांमुळे सप्टेंबर २०२१ पासून बंद ठेवण्यात आली होती.

नवीनच बांधण्यात आलेल्या जिल्हा मुख्यालय संकुलातील शासकीय इमारतीत जिल्हाधिकारी कार्यालय स्थलांतरित झाल्यापासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा (एसी) अफाट वीज देयकांमुळे सप्टेंबर २०२१ पासून बंद ठेवण्यात आली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात सौरऊर्जा प्रणाली कार्यान्वित झाल्याने हे कार्यालय आता पुन्हा गारेगार झाले आहे. मुख्यालय संकुलातील इतर कार्यालयात सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. सिडकोने उभारलेल्या जिल्हा मुख्यालय संकुलातील जिल्हाधिकारी कार्यालयाला ऑक्टोबर महिन्यात सव्वापाच लाख रुपये, जिल्हा परिषद कार्यालयाला आठ लाख रुपये तर सामुदायिक वापरासाठी साडेतीन लाख रुपयांची विद्युत देयके आल्यानंतर या सर्व कार्यालयातील वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता.

त्यानंतर विद्युत बिलाचे भार कमी करण्यासाठी दोन कोटी १३ लाख रुपये खचून सौर ऊर्जा प्रणाली बसवण्याचे निश्चित करण्यात आले होते. जिल्हा नियोजन समितीने ऑक्टोबर महिन्यात या तीनही कार्यालयांमध्ये सौर ऊर्जा प्रणाली बसवण्यासाठी मंजुरी दिली होती. हे काम महाऊर्जा विभागाच्या देखरेखीखाली हाती घेण्यात आले होते. या कामातील १५० किलोवॅट क्षमतेचा सौरऊर्जा प्रकल्प जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छतावर कार्यान्वित करण्यात आला असून त्यासाठी ७४.१३ लक्ष रुपये खर्च झाल्याचे अंदाजित आहे.

- Advertisement -

या पाठोपाठ सामुदायिक सुविधांसाठी १२० किलोवॅट क्षमतेचे (६०.२९ लाख) तर जिल्हा परिषद कार्यालयासाठी १६० किलोवॅट (७८.७४ लाख रुपये) क्षमतेचा प्रकल्प उभारण्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. हे प्रकल्प कार्यान्वित झाल्यामुळे एकूण विद्युत वापरापैकी ६० ते ७० टक्के सौरऊर्जा प्रणालीमधून वापरला जाणार असून त्यामुळे जिल्हा प्रशासनाला यापुढे वीज बिलांचा शॉक बसणार नाही याची खबरदारी घेण्यात आली आहे.

हेही वाचा –

Nawab Malik Arrest : नवाब मलिकांना मोठा धक्का, ईडी कोठडीत ७ मार्चपर्यंत वाढ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -