घरपालघरक्षमता बांधणीत पालघर जिल्हा राज्यात पाचवा

क्षमता बांधणीत पालघर जिल्हा राज्यात पाचवा

Subscribe

यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) चंद्रशेखर जगताप यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

पालघर: पुनर्रचित राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान 2022-23 अंतर्गत पंचायत राज व्यवस्थेमध्ये कार्यरत लोकप्रतिनिधी व शासकीय कर्मचारी यांचे प्रशिक्षण व क्षमता बांधणी उपक्रमाच्या आयोजनाबाबत उत्कृष्ट कामगिरी करून ग्रामीण लोकशाही बळकट करण्यामध्ये मोलाचे योगदान दिल्याबद्दल पालघर जिल्ह्याचा राज्यात पाचवा क्रमांक आला आहे. ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासनामार्फत पालघर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचा सन्मान करण्यात आला. याकरिता राज्य प्रकल्प संचालक, राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान महाराष्ट्र राज्य पुणे व संचालक राज्य ग्रामीण विकास संस्था यशदा पुणे यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, भानुदास पालवे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) चंद्रशेखर जगताप यांना प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.

सन 2022- 23 या आर्थिक वर्षात ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधी प्रशिक्षण उपक्रम, पेसा कायदा अंमलबजावणी , प्रशिक्षण तसेच संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासाच्या उद्देशाने जाहीर केलेल्या जागतिक कार्यक्रम २०३० पर्यंत १७ शाश्वत विकासाची ध्येये साध्य करण्याच्या उद्देशाने विकास आराखडयामध्ये ९ संकल्पना समाविष्ट करण्यासंदर्भात तालुका व ग्रामपातळीवर प्रशिक्षण उपक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या विभागाचे (Line Dept.) अधिकारी व कर्मचारी सरपंच, ग्रामसेवक, मुख्यसेविका, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्तरीय कर्मचारी, ग्रामसंसाधन गटाचे प्रतिनिधी, महिला स्वयंसहायता गटाचे अध्यक्ष आणि सचिव, पेसा मोबिलाईझर, ग्रामसभा मोबिलाईझर असे एकूण जिल्हयातील २४,३२१ प्रशिक्षणार्थींचे विविध पातळीवर प्रशिक्षण घेण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -