Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "कोणीही अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर...", उपमुख्यमंत्र्यांनी खडसावले

“कोणीही अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर…”, उपमुख्यमंत्र्यांनी खडसावले

Subscribe

मुंबई | “कोणीही अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर, ती व्यक्ती न्याया प्रक्रियेच्या विरोधात आहे”, अशी प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. राज्याच्या सत्तासंघर्षावरील सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालानंतर १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भा विधानसभा अध्यक्षांनी (Assembly Speaker) १५ दिवसांच्या आत निर्णय घ्यावा, अशी मागणई ठाकरे गटाकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री म्हणाले, ‘अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करणे म्हणजे न्याय प्रक्रियेला विरोध आहे.’

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात अध्यक्षांना सर्व अधिकार दिले आहेत. न्यायालयाने अध्यक्षांना निर्णय घेण्यासाठी वाजवी वेळही दिली आहे आणि कोणीही अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर, ती व्यक्ती न्याया प्रक्रियेच्या विरोधात आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे स्वत: एक वकील आहेत”

- Advertisement -

हेही वाचा – न्यायालयाने तुम्हाला नागडे केलेय, पेढे कशाचे वाटताय; राऊतांचा शिंदे-फडणवीसांवर हल्लाबोल

न्यायालयाने नागडे केले – संजय राऊत

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत माध्यमांशी बोलताना म्हणाले, ” सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल स्पष्ट आहे. ज्याला कायदा कळतो त्याला तो कळला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे चुकीच्या पध्दतीने विश्लेषण करण्यात येत आहे. ज्या पध्दतीने भाजप किंवा शिंदे गटाचे लोक एकमेकांना पेढे भरवताय, फटाके वाजवताय, नाशिकचे खासदार नाचत होते. ते पुर्णपणे चुकीचे आहे. कारण त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नागडे केले आहे, ते नागडे नाचत होते, हा नागड्यांचा नाच होता. ते लोकशाहीच्या छाताडवर नागडे नाचताय, नाचणार्‍यांच्या अंगावर न्यायालयाने एकही वस्त्र ठेवले नाही, अंतर्वस्त्रसुध्दा नाही. न्यायालयाने शिंदे गटाला नागडे करुन विधानसभा अध्यक्षांकडे पाठविले, जनता तुम्हाला माफ करणार नाही.”

 

 

- Advertisment -