घरपालघरबेचैन प्रवाशांकडून रेल्वेची दोन वेळा चेन खेचण्याचा प्रयत्न,प्रशासनाकडून कारवाई

बेचैन प्रवाशांकडून रेल्वेची दोन वेळा चेन खेचण्याचा प्रयत्न,प्रशासनाकडून कारवाई

Subscribe

या प्रकारानंतर स्टेशन प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. रेल्वे डीविजनल मॅनेजर यांची विड्याच्या पानासंदर्भातील बैठक आटोपल्यानंतर हा प्रकार घडला.

पालघर: रेल्वे स्टेशनवर चेन खेचण्याचा दोन वेळा प्रयत्न करण्यात आला. कोचिवली येथे जाणारी रेल्वे पालघर स्टेशनवर आल्यानंतर, तर दुसरी गाडी बोरिवलीकडे जाणारी हॉलीडे एक्स्प्रेस होती. या प्रकारानंतर स्टेशन प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर धावपळ उडाली. रेल्वे डीविजनल मॅनेजर यांची विड्याच्या पानासंदर्भातील बैठक आटोपल्यानंतर हा प्रकार घडला.

कोचिवली येथे जाणार्‍या रेल्वेला पालघर येथे थांबा असून ती काही काळ थांबविण्यात आली होती. त्यावेळी काही प्रवासी पिण्याचे पाणी भरण्यासाठी पाणपाईकडे आले होते. गाडी उभी करण्यात आली तेव्हा पाणी भरून घेत होते. सर्वसाधारण बोगीमध्ये एक दाम्पत्य मुंबईहून आले होते ते सुरत येथे जाण्यासाठी प्रवास करीत होते. या दरम्यान त्यातील एक महिला पाणी भरण्यासाठी उतरल्यानंतर ती येईपर्यंत गाडी सुटली होती. गाडीने जोराने वेग घेतला पण आपली पत्नी न आल्याने आणि गाडीमध्ये चढता न आल्याने पतीने रेल्वेची चेन ओढली. गार्डने लगेचच स्टेशन मास्तरकडे सूचना केली आणि पोलिसांचा ताफा त्या डब्याकडे गेला. ज्यांनी चेन ओढली त्यांनी कबूल केल्यानंतर त्यांना समज देण्यात आली आणि मागाहून येणार्‍या गाड्यांचा खोळंबा होवू नये म्हणून गाडी मार्गस्थ करण्यात आली.

- Advertisement -

हा प्रकार घडल्यानंतर लगेचच दुसर्‍या गाडीत चेन ओढण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी दोन प्रवासी यार्डमध्येच उतरल्याचा संदेश गार्डने पोलिसांना दिला. आई आणि मुलगा असे प्रवास करणारे होते. सुरत ते बोईसर असे त्यांच्याकडे सर्वसाधारण तिकीट होते. मात्र, ज्या गाडीतून प्रवास करीत होते त्या गाडीला बोईसर येथे थांबा नव्हता. वापी ते बोरिवली दरम्यान एकाही स्टेशनवर थांबा नसल्याने बोईसरच्या पुढे गाडी आल्यानंतर पालघरमध्ये तरी गाडी थांबविता येईल या उद्देशाने यातील एकाने चेन खेचण्याचा प्रकार घडला. या प्रकरणाचा संदेश त्या गाडीमध्ये असलेल्या गार्डने रेल्वे पोलिसांना दिला. त्यानंतर ही गाडी यार्डमध्ये थांबवली गेली. या दोघांना यार्डमध्येच उतरावे लागले. संबंधित गार्डने लागलीच या दोघा संदर्भातील संदेश रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी त्यातील एकाला न्यायालयात हजर करण्यात येणार असून रेल्वेचे नियम मोडणार्‍यांना ही चपराक असल्याचे दिसून आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -