घरपालघरबोईसरमध्ये अनधिकृत बांधकामांवर महसुलचा हातोडा

बोईसरमध्ये अनधिकृत बांधकामांवर महसुलचा हातोडा

Subscribe

या कारवाईने शासकीय भूखंडावर तसेच आदिवासींच्या जागेवर अनधिकृतरित्या बांधकामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

बोईसर : बोईसरमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहीम पालघर महसूल विभागाने सुरूच ठेवली आहे.बोईसर दांडीपाडा,लोखंडी पाडा आणि गणेश नगर येथील अनधिकृत व्यापारी गाळे जमीनदोस्त करण्याची कारवाई आज पालघर महसूल विभागाने केली आहे.पालघर महसूल विभागाने बोईसरमधील गणेश नगर,लोखंडी पाडा आणि दांडी पाडा येथील शासकीय आणि आदिवासी जागेवरील ८० अनधिकृत गाळे उध्वस्त केले.दांडी पाडा व शेजारील लोखंडी पाडा येथील सर्वे नंबर ३०, २७/१, ६५/४६ वरील सरकारी जागेवरील अनधिकृत व्यापारी गाळ्यांचे बांधकाम निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली. पालघरचे तहसीलदार सुनील शिंदे यांच्या आदेशानुसार मंडळ अधिकारी मनीष वर्तक आणि तलाठी उज्वला पाटील व महसूल कर्मचारी यांच्या देखरेखीखाली जेसीबीच्या साहाय्याने ही बांधकामे पाडण्यात आली.या कारवाईने शासकीय भूखंडावर तसेच आदिवासींच्या जागेवर अनधिकृतरित्या बांधकामे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

बोईसर – तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे प्रचंड नागरिकरण झाल्यामुळे परिसरातील जमिनीला सोन्याचा भाव आला आहे. यातच भू – माफियांकडून शासकीय भूखंड मोठ्या प्रमाणात हडप करण्यात आले असून त्यावर अनधिकृत गाळे व चाळी बांधल्या आहेत. तर परप्रांतीय कामगार तसेच बिगर आदिवासी यांच्याकडून आदिवासींना विविध आमिषे दाखवून त्यांच्या जमिनी कवडी मोलाने वाणिज्य वापर करिता घेतलेल्या आहेत. मुळात आदिवासींना शेती करण्यासाठी शासनाकडून देण्यात आलेल्या जमिनीवर स्थानिक भूमाफियांनी मोठ्या प्रमाणात चाळी व गाळ्याचे अनधिकृत बांधकामे उभी केली आहेत. याबाबत अनेक तक्रारी महसूल कार्यालयांत करण्यात आल्या होत्या. त्याअनुषंगाने ही कारवाई करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -