घरपालघरमानवनिर्मित वणव्यांमुळे उरलीसुरली जंगले धोक्यात

मानवनिर्मित वणव्यांमुळे उरलीसुरली जंगले धोक्यात

Subscribe

अलीकडच्या काळात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जमिनीची धूप तर होतेच शिवाय पर्यावरणाचा र्‍हासही होत आहे. पर्यावरणाचा संतुल राखायचा असेल तर वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे.

जव्हार: जव्हार तालुक्यात अनेक ठिकाणी पाण्याची मोठ्या प्रमाणात असणारी समस्या आहे, या कारणामुळे शेत कामे आटोपल्यानंतर जनावरे विक्री केली जातात. जी जनावरे विक्री केली जात नाहीत अशी जनावरे रानात सोडून दिली जातात. जनावरांसाठी चार्‍याची व्यवस्था झाल्यानंतर रानात कुणीही फिरकत नाही, याच संधीचा फायदा घेत काही व्यक्ती जाणीवपूर्वक गवत जाळत आहेत आणि याचे रूपांतर वनव्यात होत चालले आहे. त्यामुळे या वनव्यात जैवविविधता जळून खाक होत चालली आहे. सध्या वातावरणात प्रचंड प्रमाणात बदल जाणवत आहेत. संध्याकाळी ६ वाजल्यापासून तर सकाळी ७ वाजेपर्यंत कडाक्याची थंडी जाणवते .परंतु एकदा सूर्य उगवल्यानंतर तापमानात हळू हळू वाढ होत जाते. त्यामुळे लागवडीबरोबर वृक्ष संवर्धनही तितकेच महत्त्वाचे आहे. अलीकडच्या काळात दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जमिनीची धूप तर होतेच शिवाय पर्यावरणाचा र्‍हासही होत आहे. पर्यावरणाचा संतुल राखायचा असेल तर वृक्षसंवर्धन महत्वाचे आहे.

तालुक्यात वणव्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे डोंगर काळे दिसू लागले आहेत. निसर्ग सौंदर्य बिघडत आहे. पर्यावरणाची अतोनात हानी होत आहे. त्यामुळे जनजागृती करून वणवे लावण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे.
राजीव मोरघा , निसर्गप्रेमी

- Advertisement -

कोणत्याही प्रकारे आग लागू नये म्हणून मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी ३ मीटर पर्यंत स्वच्छता करण्यात येणार आहे. कोणतीही व्यक्ती वनवा लावताना प्रत्यक्ष आढळल्यास किंवा संशयित म्हणून समजल्यास अशा व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
-दिनकर पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी,मोबाईल पथक,जव्हार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -