घरपालघरमिरा भाईंदर शहरात रिक्षा दुरुस्ती रस्त्यावरच

मिरा भाईंदर शहरात रिक्षा दुरुस्ती रस्त्यावरच

Subscribe

मिरा भाईंदर शहरात महापालिकेने करोडो खर्च करून अनेकदा दिखाव्याची कारवाई करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावरच गॅरेज चालक वाहने दुरुस्त करताना दिसून येत आहेत.

मिरा भाईंदर शहरात महापालिकेने करोडो खर्च करून अनेकदा दिखाव्याची कारवाई करण्यात येत आहे. यामुळे रस्त्यावरच गॅरेज चालक वाहने दुरुस्त करताना दिसून येत आहेत. मिरा भाईंदरमध्ये वाहतूक समस्या सोडवण्याकरता अनेकदा पालिका व प्रशासनाने प्रयत्न केले आहेत. परंतु गॅरेजवाल्यांचा हैदोस इतका जास्त आहे की, आता त्यांच्या समोर पालिकेने राबवलेल्या कारवाईच्या अनेक योजना देखील निकामी पडताना दिसून येत आहेत. वाहने रस्त्यावर मध्यभागी किंवा पालिकेने बनवलेल्या लाखोंच्या गटारावर बेशिस्तपणे उभी करुण गॅरेजवाल्यांनी काम करू नये, अशी सक्त ताकीद असताना देखील काही गॅरेजवाले डांबरी रस्त्यावर दुचाकी, चारचाकी, रिक्षा उभी करून बिनधास्तपणे काम करतात. यांना कोणाचा आशीर्वाद असतो. ज्यामुळे हे पालिकेच्या लाखो-करोडोंच्या रस्त्यांचा, गटारांचा वापर वाहने उभी व दुरुस्त करण्याकरता करतात, असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडला आहे. पालिकेचे प्रभाग अधिकारी व कर्मचारी यांनी वारंवार कारवाई करून देखील या गोष्टी पुन्हा होत असल्याने नवल व्यक्त केले जात आहे.

भाईंदरमधील रामदेव पार्क, इंद्रलोक, ओम शांती चौक परिसरात गॅरेजवाल्यांनी मात्र कहर केला आहे. चक्क रस्त्यांवर उघडपणे वाहने दुरुस्त करण्याचे काम गॅरेजवाले करत आहेत. पालिकेने अनेकदा नोटीसदेखील दिल्या. वाहने टोईंग करून कारवाई केल्या. परंतु यांना काही फरक पडत नाही. गॅरेजची वाहने उभी करून बेशिस्तपणे रोडवर काम करणाऱ्या अनेक गॅरेज चालकांचा समावेश आहे. यापैकी किती जणांकडे गॅरेज चालवण्याकरता लागणारे परवाने आहेत, हे पालिकेने तपासले पाहिजे. गटार व रस्त्यांना पार्किंग अड्डा बनवला आहे. उभ्या करण्यात आलेल्या वाहनांच्यामुळे सफाई कर्मचारी यांना कचरा देखील व्यवस्थितरित्या साफ करता येत नाही. यामुळे वाहनांच्या मागे कचऱ्याचे ढीग लागलेले दिसून येतात. ओमशांती चौक येथे एका वेळी ८ ते १० रिक्षा रस्त्यावर उभ्या करून गॅरेजवाल्यांची कामे सुरू असतात. रामदेव पार्क व लल्लन तिवारी रोड जवळ असणाऱ्या गॅरेज बाहेर तर गटर आहे की, नाही हे दिसणे अशक्य झाले आहे. रामदेव पार्क परिसरात अनेक रुग्णालये आहेत. मात्र गाड्या रस्त्यावर लावलेल्या असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. प्रभाग क्रमांक ४ च्या हद्दीतील ओमशांती चौक व रामदेव पार्कजवळ रस्त्यावर रिक्षाच्या लाईन लावून दुरुस्ती करणाऱ्या गॅरेज चालकांवर कारवाई केली जाणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

एसटी कर्मचाऱ्यांच्या पैशातून सदावर्ते मालामाल, जमवली कोट्यवधींची संपत्ती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -