घरपालघरविरार पश्चिमेतील गोकुळ टाऊनशिप येथे रस्ता खचला

विरार पश्चिमेतील गोकुळ टाऊनशिप येथे रस्ता खचला

Subscribe

यामुळे या परिसरातून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. विरार पश्चिम भागात गोकुळ टाऊनशिप परिसरात मुलजीभाई मेहता शाळा आहे.

विरार : विरार पश्चिमेतील गोकुळ टाऊनशिप येथील मुलजीभाई मेहता शाळेसमोरील रस्त्यावर ठीक ठिकाणी मोठे खड्डे पडल्याने रस्ता खचला आहे. यामुळे या परिसरातून नागरिकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
विरार पश्चिम भागात गोकुळ टाऊनशिप परिसरात मुलजीभाई मेहता शाळा आहे. या समोरील संपूर्ण मार्गावर मोठे खड्डे पडल्याने हा रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली आहे. या मार्गावरून नेहमीच वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच या ठिकाणी विद्यालय असल्याने शालेय बस, शालेय विद्यार्थी देखील याच रस्त्यावरून ये- जा करत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा रस्ता खचत असल्याची बाब समोर आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अचानकपणे रस्ता खचू लागल्याने या ठिकाणी मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मागील आठवड्यात याच मार्गावर सांडपाण्याचा निचरा करणार्‍या पाईपलाईनचे काम सुरू असताना ट्रक रस्त्याच्या कडेला उभा केल्यानंतर रस्ताच खचून गेल्याचे समोर आले आहे. सुदैवाने या घटनेत मोठी दुर्घटना टळली. मात्र यामुळे संपूर्ण रस्त्याला भगदाडे पडली असून हा मार्ग अतिशय धोकादायक झाला आहे. पालिकेमार्फत काही ठिकाणी तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. मात्र पावसामुळे रस्त्याची पुन्हा बिकट अवस्था निर्माण झाली असून या ठिकाणी पुन्हा मोठी दुर्घटना घडू शकते.

विरार पश्चिमेतील गोकुळ टाऊनशिप परिसरातील रस्ता हा पूर्णपणे खचला असून ठिकाणी मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे वसई- विरार शहर महानगरपालिकेने या रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे ऑडिट करून रस्ता पुनर्बांधणीसाठी द्यावा, अशी मनसेची मागणी आहे.
– प्रविण राऊत, (मनसे शहर सचिव विरार)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -