घरपालघरवसई- विरार महानगरपालिकेचा प्लास्टिक कारवाईचा धडाका

वसई- विरार महानगरपालिकेचा प्लास्टिक कारवाईचा धडाका

Subscribe

या मोहिमेत एकूण दीड टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १० हजारांचा दंड वसूल केला आहे.

विरार : राज्यात प्लास्टिकवर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर वसई- विरार महानगरपालिकेने प्लास्टिकमुक्त शहर करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे पालिकेची प्लास्टिकवर सातत्याने कारवाई सुरुच आहे. त्यानुसार ’प्रभाग समिती डी’, व ’एच’ आरोग्य निरीक्षकांमार्फत प्लास्टिक पिशवी जप्ती मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत एकूण दीड टन प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १० हजारांचा दंड वसूल केला आहे.प्लास्टिक या अविघटनशील कचर्‍यामुळे मानवी तसेच निसर्गावर होणारे दुष्परिणाम लक्षात घेत वसई -विरार महानगरपालिकेने पूर्णत: प्लास्टिकबंदी केली आहे. असे असले तरी शहरात प्लास्टिकचा सर्रास वापर होत असल्याचे पुढे आले आहेत. विशेष म्हणजे महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने मोठ्या प्रमाणावर कारवाई करून दंड वसूल केला आहे. यातीलच एक मोठी कारवाई बुधवारी पार पडली. ’प्रभाग समिती ‘डी’ व ’एच’ आरोग्य निरीक्षकामार्फत घेण्यात आलेल्या प्लास्टिक पिशवी जप्ती मोहिमेत एकूण १ हजार ५०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून १० हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे.

या आस्थापनांमध्ये बंदी
नागरिक, संस्था, कार्यालये, दुकाने, हॉटेल्स, खानावळ, दूध विक्रेते, भाजी विक्रेते व अन्य सर्व प्रकारच्या कुठल्याही आस्थापनामध्ये प्लास्टिकचा वापर किंवा साठवणूक झाल्यास नियमाप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -