घरपालघरपालिकेचे मिशन बुलडोझर

पालिकेचे मिशन बुलडोझर

Subscribe

यावेळी सहा.आयुक्त धनश्री शिंदे, कनिष्ठ अभियंता कल्पेश कडव, लिपिक विजय नडगे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

वसईः वसई विरार महापालिकेने अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई सुरुच ठेवली असून गेल्या तीन दिवसांत अनेक बांधकामे जमिनदोस्त करण्यात आली. प्रभाग समिती ‘सी’ मधील चौधरी वाडी, सहकार नगर, विरार पूर्व परिसरातील तीन इमारतींचे वरचे दोन मजले व त्याचठिकाणी बांधकाम सुरु असलेल्या एका रिकाम्या इमारतीचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती ‘सी’ चंदनसार चे प्र.सहा.आयुक्त गणेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली निष्कासीत करण्यात आले. तसेच गोपचरपाडा येथील नाल्यालगत दोन गाळे व ६ सदनिका असलेल्या दोन मजली इमारतीवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी उपायुक्त अजित मुठे, प्र.सहा.आयुक्त गणेश पाटील, अतिक्रमण विभाग प्रमुख विजय गोतमारे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता. प्रभाग समिती ‘जी’ वालीव अंतर्गत वसई पूर्वेकडील धुमाळनगर येथील सर्व्हे नं.३४/१ वालीव, वसई पूर्व या ठिकाणी अनधिकृत पत्राशेडच्या बांधकामावर सहा.आयुक्त धनश्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी सहा.आयुक्त धनश्री शिंदे, कनिष्ठ अभियंता कल्पेश कडव, लिपिक विजय नडगे, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

प्रभाग समिती ‘एफ’ मधील संतोषभुवन, हवाईपाडा, नालासोपारा पूर्व येथील परिसरातील दोन अनधिकृत गाळ्यांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. यावेळी प्रभाग ‘एफ’ चे अतिक्रमण विभागाचे अभियंता कनिष्ठ किशोर पोवार व केयूर पाटील, महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान व अतिक्रमण विभागाचा कर्मचारी वर्ग उपस्थित होते. गुरुवारी विरार पूर्वेकडील तीन मजली अनधिकृत इमारत निष्कासित करण्यात आली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -