घरपालघरआता तरी लेट लतिफांवर कारवाई होणार का ?

आता तरी लेट लतिफांवर कारवाई होणार का ?

Subscribe

त्यांच्याकडून स्पष्टीकरणही घेण्यात आली. मात्र कामाचे ढोंग स्पष्टीकरणात केल्याचे दिसून आले. यामध्ये अधिकारी वर्गाचाही समावेश आहे.

नदीम शेख,पालघर: पालघर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यालयामध्ये अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या हजेरीसाठी बायोमेट्रिक प्रणाली कालपासून (बुधवार १ फेब्रुवारी) सुरू करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानामुळे अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या लेटलतिफांच्या वर्षानुवर्षांच्या निमित्ताला खोडा बसणार आहे. नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कार्यालयीन भेटी दिल्यानंतर अधिकारी-कर्मचारी वेळेत कामावर येत नसल्याचे निदर्शनास आले होते. असे प्रकार वारंवार घडू लागल्यानंतर उशिरा येणार्‍यांना नोटिसा वाजवण्यात आल्या होत्या. त्यांच्याकडून स्पष्टीकरणही घेण्यात आली. मात्र कामाचे ढोंग स्पष्टीकरणात केल्याचे दिसून आले. यामध्ये अधिकारी वर्गाचाही समावेश आहे.

अलीकडच्या काळात कामावर उशिरा येण्याचे कर्मचार्‍यांचे प्रमाण कमी झाले असले तर तंतोतंत वेळेचे काटेकोर पालन होत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कर्मचारी वर्गाचे बायोमेट्रिक हजेरी घेण्याचा प्रस्ताव मंजूर करून त्यानुसार अधिकारी-कर्मचारी वर्गाला बायोमेट्रिक सक्ती करण्यात आल्याने शासकीय कार्यालयात हा चांगला उपक्रम राबविला असल्याचे सांगितले जात आहे. कार्यालयातील सर्व विभागांच्या मुख्य द्वारावर या प्रणाली लावण्यात आल्या आहेत. सध्या कामावर असलेल्या कर्मचारी वर्गाची माहिती प्रणालीवर भरण्याचे काम प्रगतीपथावर असले तरी बायोमेट्रिकद्वारे हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे उशिरा येणार्‍या कर्मचारीवर्गाला चांगलाच धडा मिळाला आहे. शासनाच्या परिपत्रकानुसार ग्रामसेवक आणि ग्रामविकास अधिकार्‍यांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यानुसार पालघर जिल्हा परिषदेकडून या परिपत्रकाच्या आदेशावर काय निर्णय होईल हे पाहावे लागणार आहे.

- Advertisement -

1.जिल्हा परिषदेच्या कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असली तरी पंचायत समित्या, ग्रामपंचायत व इतर यंत्रणांमध्ये ही प्रणाली बसविण्याचे अजूनही प्रयोजन नाही.

2.जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी एका पत्रकार परिषदेत जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत असलेल्या सर्व आस्थापनांमधील अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी बायोमेट्रिक प्रणाली लागू केली जाईल असे सांगितले होते. मात्र आता ती प्रणाली फक्त जिल्हा परिषद मुख्य कार्यालयासाठी लागू केली आहे.

- Advertisement -

3.अनेक अधिकारी व कर्मचारी फिल्ड व्हिजिट हा सोपा शब्द वापरून कामावर उशिराने येत होते. तर काहीजण मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या कामाचा दाखला देऊन कामामुळे उशीर झाला असे भासवण्याचा प्रयत्न करत होते. अशा फसवे अधिकारी-कर्मचारी वर्गासाठी जिल्हा परिषद काय शिक्षा ठरवेल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -