मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टेंभीनाक्यानंतर मुंबईतील नामांकित दहीहंडी उत्सवात सहभाग

आज राज्यभरात सर्वत्र दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. मागील दोन वर्षांच्या ब्रेकनंतर यंदा नागरिकांमध्ये दहीहंडी जल्लोषात साजरी केली जात आहे. दरम्यान, याचं निमित्ताने मुंबईमधील अनेक ठिकाणी सार्वजनिक दहीहंडीचा कार्यक्रम साजरे केले जात आहेत. याचेच अवचित्य साधत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या टेंभी नाक्यावरील दहीहंडीला भेट दिली.टेंभी नाक्यावरील दहीहंडीला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घाटकोपरमधील भाजपा आमदार राम कदम यांच्या दहीहंडीला भेट दिली. त्यावेळी त्यांच्यासोबत मंत्री मंगलप्रभात लोढा देखील उपस्थित होते.