महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे आज, सोमवारी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पनवेलच्या फॉरेस्ट कॉलनी रोड येथे भूमिपूजन झाले. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त संकुल इमारतीचे आज राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते पनवेलच्या फॉरेस्ट कॉलनी रोड येथे भूमिपूजन झाले.
या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्यविकास मंत्री मंगलप्रभात लोढा, रायगडचे पालकमंत्री उदय सामंत उपस्थित होते.
पनवेलच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था परिसरातील १० एकर जागा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या मुख्यालयाकरिता उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
राज्यातील युवक- युवतींना कौशल्य प्रशिक्षण देण्याकरिता तसेच त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील कौशल्याधारित उच्च शिक्षणाद्वारे रोजगारक्षम करण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.
येत्या शैक्षणिक वर्षापासून कौशल्य विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांना कौशल्य शिक्षण उपलब्ध करण्यासाठी पाच कौशल्य प्रशालांची आणि त्याअंतर्गत अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
त्यानुसार महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाचे मुख्यालय आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था, पनवेल यांचे एकत्रित बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.
पर्यावरणपूरक इमारत बांधकाम करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
हा परिसर ग्रीन कॅंपस तसेच कार्बन नेट झीरो पद्धतीचा असेल.
सध्या कौशल्य विद्यापीठाचे मुख्य कार्यालय तात्पुरत्या स्वरूपात एल्फिस्टन तांत्रिक महाविद्यालयात सुरू करण्यात आले आहे.
या अभ्यासक्रमांचा शुभारंभ तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते १ नोव्हेंबर २०२२ रोजी करण्यात आला.
राज्यात सध्या गद्दारांचं सरकार आहे. सरकारने ज्या काही सर्वसामान्य आणि शेतकऱ्यांसाठी घोषणा केल्या आहेत त्या केवळ होर्डिंग्जवर आहेत. शेतकऱ्यांपर्यंत अजूनही पुरेशी मदत पोहोचलेली नाही....
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाच्या दट्ट्यामुळे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नजीकच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांना पक्षांतर बंदी कायद्याच्या अंतर्गत अपात्र ठरविल्यास...
भाजप आमदार गोपचंद पडळकर आणि अजित पवार यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पडळकरांनी अनेकदा शरद पवारांसह पवार घराण्यावर टीका केली आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी...