घरदेश-विदेशबिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वींच्या घरी 'लक्ष्मी'चे आगमन; म्हणाले, ईश्वराने कन्यारत्नाचा उपहार दिला

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वींच्या घरी ‘लक्ष्मी’चे आगमन; म्हणाले, ईश्वराने कन्यारत्नाचा उपहार दिला

Subscribe

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना कन्यारत्न झाले आहे. त्यांची पत्नी राजश्री यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. सोमवारी सकाळी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे.

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना कन्यारत्न झाले आहे. त्यांची पत्नी राजश्री यांनी एका मुलीला जन्म दिला आहे. सोमवारी सकाळी राष्ट्रीय जनता दल पक्षाचे नेते तेजस्वी यादव यांनी ट्विट करत ही आनंदाची बातमी दिली आहे. तेजस्वी यादव यांनी आपल्या ट्वीटर हॅंडलवरुन ट्वीट करत लिहिले की, ‘देवाने आनंदी होऊन आम्हाला कन्या रत्नाच्या रुपात भेट पाठवली  आहे’.

राजश्रीबद्दल बोलायचे झाले तर त्या दिल्लीच्या रहिवासी आहेत. त्यांचे वडील चंदीगडमधील एका शाळेचे प्राचार्य होते.  राजश्रीने बहुराष्ट्रीय युनिव्हर्सल बँक बार्कलेजमध्ये दीर्घकाळ काम केले आहे, परंतु तेजस्वी यादव यांच्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी नोकरीतून ब्रेक घेतला.

- Advertisement -

मुलीच्या जन्माने यादव कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव सुरू झाला आहे. जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन (लालन) सिंह यांनीही त्यांच्या सरकारमधील सहयोगी असलेल्या आरजेडीचे नेते तेजस्वी यादव यांचे अभिनंदन केले आहे. मुंगेरचे खासदार लालन सिंह यांनी लिहिले की, बिहारचे युवा नेते आणि माननीय उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या घरी लक्ष्मी कन्या रत्नाच्या आगमनाबद्दल हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

( हेही वाचा: हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगली घडवण्याचा भाजपचा कट, विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंचा गंभीर आरोप )

- Advertisement -

बहिण रोहिणी आचार्य हिच्याकडूनही अभिनंदन

तेजस्वी यादव यांची बहीण रोहिणी आचार्य यांनीही भाऊ तेजस्वी आणि वहिनी राजश्री यांचे घरामध्ये छोट्या मुलाचे स्वर गुंजल्याबद्दल अभिनंदन केले आहे. रोहिणीने एका काव्यमय संदेश ट्वीट करत अभिनंदन केले आहे. “भाई-भाभी के चेहरे पर खिली मुस्कान रहे मेरे घर में खुशियों का सदा यूँही वास रहे, मन सुख के सागर में गोते भरे पापा बनने की खुशी में भाई तेजस्वी के चेहरे पे ऐसी खुशियां झलके”

( हेही वाचा: उगाच बोलायला लावू नका…, जितेंद्र आव्हाड आणि शीतल म्हात्रे यांच्यात ट्वीटरवॉर )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -