कणकवलीत वागदे ते कलमठपर्यंत भाजपाची भव्य मोटारसायकल रॅली

कणकवलीत भाजपची भव्य बाईक रॅली काढण्यात आली असून प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे अग्रस्थानी होते. महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील सुद्धा मोटरसायकल रॅलीत सहभागी होते. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः बुलेट स्वार बनले. तर त्यांच्या मागे आमदार नितेश राणे बसले होते. शेकडो मोटारसायकल व भाजपाचे झेंडे यामुळे भाजपामध्ये वातावरण निर्माण झाले होते. आमदार नितेश राणे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या रॅली सहभागी झाल्याने या रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला.