बॉलिवूडची ‘शेरनी’ विद्या बालनचे घायाळ करणारे लुक

know how you can wear saree like bollywood sherni vidya balan
बॉलिवूडची 'शेरनी' विद्या बालनचे घायाळ करणारे लुक

बॉलीवूड अभिनेत्री विद्या बालनचे साडी या पारंपारिक पोशाखावर असलेले प्रेम कुणापासून लपलेले नाही. विद्या केवळ भारतीय कार्यक्रमांमध्येच नाही तर आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्येही साडी नेसणे पसंत करते. विद्या दररोज विविध प्रकारच्या साड्या नेसत असून एकदा वापरलेली साडी पुन्हा कधीही वापरत नाही. विद्या एका वर्षात जवळपास ३०० हून अधिक साड्या खरेदी करते. तिच्या वार्डरोबमध्ये हँडलूम, कॉटन, टसर आणि शिफॉनसारख्या वेगवेगळ्या फॅब्रिकपासून बनवलेल्या साड्या आहेत. नुकताच विद्याचा शेरनी हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानही तिचे साडीवरील प्रेम पाहायला मिळाले. तर आज आम्ही तुम्हाला विद्याच्या काही लेटेस्ट साडीतील लुकबद्दल सांगणार आहोत. जे तुम्हाला नक्कीच आवडतील.