Bharti Singh चं ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या रोमँटीक पोझ

भारती सध्या आठ महिन्यांची प्रेग्नंट आहे. आठव्या महिन्यातही भारती टेलिव्हिजनवर काम करत आहे. सेटवर सुद्धा भारती त्याच उत्साहात एक्शन मोडमध्ये दिसून येते.

laughter queen bharti singh share latest maternity photoshoot
Bharti Singh चं ग्लॅमरस मॅटर्निटी फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या रोमँटीक पोझ

लाफ्टर क्विन भारती सिंग आणि पती हर्ष लिंबाचिया लवकरच आई बाबा होणार आहे. बाळाच्या येण्याची वाट पाहत असलेलं हे कपल प्रेग्नंसीच्या काळातील प्रत्येक क्षण एकमेकांसोबत सेलिब्रेट करत आहेत. भारती सध्या आठ महिन्यांची प्रेग्नंट आहे. आठव्या महिन्यातही भारती टेलिव्हिजनवर काम करत आहे. सेटवर सुद्धा भारती त्याच उत्साहात एक्शन मोडमध्ये दिसून येते. सेटवरचे अनेक फोटो ती सतत शेअर करत असते. भारतीने नुकतचं मॅटर्निटी फोटोशूट केलंय. या फोटोशूटमध्ये भारतीचा प्रेग्नंसी ग्लो दिसून आला आहे. भारतीने पती हर्ष सोबतही रोमँटिक पोझेस देत फोटोशूट केलं आहे.

भारतीने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं, मला माझ्या प्रेग्नंसीच्या बाबतीत माहितीच नव्हतं. मी अडीच महिन्यांची प्रेग्नंट होती. ज्या दिवशी मला कळलं मी अडीच महिन्यांची प्रेग्नंट आहे त्या दिवशी मी फार शॉक झाले. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी भारतीला जुळी मुले होणार अशा ही चर्चा रंगल्या होत्या त्यावर भारती म्हणाली, “तुम्हाला वाटत का हे जुळ्या मुलांचं पोट आहे. आम्हाला जुळी मुले होणार नाहीत. आम्हाला एकच बाळ होणार आहे. पण आता तो बाबा आहे की बाबी हे आम्हाला माहिती नाही”. भारती आणि हर्ष यांचे बाळ या जगात यायला आता केवळ एक महिना बाकी आहे. दोघेही त्यांच्या पहिल्या बाळासाठी खूप उत्साही आहेत.

पाहा भारतीचं मॅटर्निटी फोटोशूट