घरठाणेटोमॅटोचा ट्रक उलटल्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतुकीचे तीन तेरा

टोमॅटोचा ट्रक उलटल्यामुळे घोडबंदर रोडवर वाहतुकीचे तीन तेरा

Subscribe

कर्नाटक येथून विरारला टोमॅटो लोड करून ठाण्यातील घोडबंदर रोडकडे निघालेला ट्रक दुभाजकाला धडक देत शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास गायमुख गावाजवळ उलटला. यामुळे ट्रक मधील टोमॅटोचा खच रस्त्यावर पडला होता. तसेच रस्त्याच्या मधोमध ट्रक उलटल्याने घोडबंदर रोडकडून ठाण्याकडे येणाऱ्या वाहतुकीचे तीन तेरा वाजले होते. साधारण रविवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास रस्ता वाहतुकीसाठी मोकळा झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.

उमेश गौडा यांच्या मालकीचा ट्रक घेऊन त्यांचा चालक हा टोमॅटो घेऊन कर्नाटककडून विरारकडे जात असताना (रस्ता चुकल्यामुळे) गायमुख चौपाटी समोरील रोड दुभाजकावर धडकून घोडबंदर रोडवरून ठाण्याकडे येणाऱ्या रोडवरती येऊन उलटला. यावेळी घोडबंदर रोडवरती मोठ्या प्रमाणात ट्रक मधील टोमॅटो पडल्याने टोमॅटोचा खच पाहण्यास मिळाला.या घटनेची माहिती मिळाल्यावर आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दल आणि कासारवडवली पोलीस कर्मचारी, कासारवडवली वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

- Advertisement -

सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. याचदरम्यान १- हायड्रॉलिक क्रेन, १-जेसीबी पाचारण केले होते.हायड्रॉलिक क्रेनच्या साह्याने रोडच्या बाजुला करण्यात आला आहे. आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान व १-जेसीबीच्या मदतीने रोडवरती पडलेले टोमॅटो रोडच्या एका बाजूला करून रोडवरती माती टाकण्यात आली आहे. त्यानंतर घोडबंदर रोड सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अविनाश सावंत यांनी दिली.


हेही वाचा : मुख्यमंत्र्यांच्या नकारानंतरही भेटण्याचा प्रयत्न सुरूच ठेवणार – इम्तियाज जलील

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -